शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड मार्गावर भीषण अपघात; भरधाव कार ट्रकवर आदळून सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 01:06 IST

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना कारची ट्रकला जोरदार धडक; कारच्या पुढील भागाचा चक्काचूर

नागपूर: उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्याजवळ भरधाव तवेरा ट्रकवर आदळली. त्यामुळे भीषण अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास राम कुलर कंपनीजवळ हा भीषण अपघात झाला. एमएच ४९/ ४३१५ क्रमांकाच्या तवेरा कारमध्ये बसून नागपुरातील एका महिलेसह सात जण उमरेड मार्गाने जात होते. समोर एक ट्रक होता. तवेराचा वेग मर्यादित वेगापेक्षा जास्त होता. अशात चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे तवेराचा समोरचा भाग पुरता चक्काचूर होऊन आतमधील सात जण ठार झाले. तर एक बालिका गंभीर जखमी झाली. रस्त्याने जाणाऱ्यांनी बऱ्याच वेळेनंतर ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर उमरेड पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. मात्र, अपघाताचे स्थळ नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येत असल्याने त्यांनी ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना कळविली. त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास हुडकेश्वर पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत जखमी बालिकेला इस्पितळात दाखल करण्यात आले होते.घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अपघात कसा झाला त्याबद्दलची चौकशी सुरू केली. मात्र तोपर्यंत प्रत्यक्षदर्शी निघून गेल्याने नेमका अपघात कसा झाला त्याबद्दलची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

दरम्यान, या भीषण अपघातात चे वृत्त कळताच पोलीस उपायुक्त नुरुल हसन, वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड यांच्यासह शहर पोलिसांचा ताफा अपघातस्थळी पोहोचला. त्यांनी अपघात स्थळावरची वाहन रस्त्याच्या बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. जखमी बालिकेकडून अपघाताबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध न झाल्यामुळे  वारंवार प्रयत्न करूनही पोलिसांकडून अपघातातील मृत अथवा जखमींची नावे स्पष्ट करण्यास असमर्थता दर्शविली गेली.