शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 10:08 IST

मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाची गती इतकी संथ आहे की, ४६ योजनांचा आराखडा तयार झाल्यानंतरही २०१८-१९ या वर्षात केवळ २८ योजनांचे कार्यारंभ आदेश मिळू शकले.

ठळक मुद्दे४६ पैकी २८ योजनाच मार्गीएक वर्ष नुसते आढावा घेण्यात गेले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीव्र पाणीटंचाई भेडसावत असलेल्या गावांसाठी गेल्या दोन वर्षापासून मुख्यमंत्री पेयजल योजना अमलात आणली. परंतु या योजनेच्या कामाची गती इतकी संथ आहे की, ४६ योजनांचा आराखडा तयार झाल्यानंतरही २०१८-१९ या वर्षात केवळ २८ योजनांचे कार्यारंभ आदेश मिळू शकले.राष्ट्रीय पेयजल योजनेमधील प्रकल्प राबविताना केंद्राचा निधी उशिरा मिळत असल्याने कामांना ब्रेक लागायचा़ त्यामुळे राज्य शासनाने आपल्या हक्काच्या निधीचा वापर करीत मुख्यमंत्री पेयजल योजना अमलात आणली़ परंतु दोन वर्षांपासून ही योजना कागदावरून पुढे सरकायचे नाव घेत नाही़त्यामुळे या योजनेची कमालीची कासवगती असल्याचे पहायला मिळते आहे़ २०१५-१६ या वर्षात ही योजना लागू करण्यात आली़ सुरुवातीच्या वर्षात तीव्र टंचाईयुक्त गावांची यादी तयार करून ती शासनाच्या पाणीपुरवठा खात्याला सादर करण्यात आली़ अंदाजपत्रकीय मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झालेत़ परंतु काही ग्रामपंचायतने ही योजना राबविण्यासाठी नकार दिल्याने ग्रामपंचायत ठरावच पाणीपुरवठा विभागाला अप्राप्त होते़ त्यामुळे २०१६-१७ हे वर्ष नुसते या योजनांचा आढावा आणि कागदी दस्ताऐवजांचा पाठपुरावा करण्यात गेले़२०१७-१८ या वर्षात ४६ पैकी ४१ योजनांना तांत्रिक मंजुरी शासनाकडून मिळाली व २८ योजनांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले़ परंतु अद्यापही प्रत्यक्षात काम सुरू करावयास अडथळे आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाच्या मदतीने ही योजना राबविण्यात येत आहे़ टप्पा क्रमांक १ मध्ये २१ योजना, टप्पा २ मध्ये ६ तर टप्पा क्रमांक ३ मध्ये १ योजना मार्गी लागणार आहे़ परंतु प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त या उन्हाळ्यात तरी होईल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे़या योजना टप्पानिहाय सुरू आहे़ तांत्रिक मान्यता जसजशी मिळत आहे़ तशा या योजनेतील कामे मार्गी लागत आहे़ संपूर्ण कामे करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन असल्याचे जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी