शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

देशप्रेमाचे स्फुलिंग जागविणारे ‘जॉर्ज’ यांचे ‘ते’ भाषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 20:27 IST

जॉर्ज फर्नांडिस यांचे उपराजधानीशी कार्यकर्ता जीवनापासून जुने ऋणानुबंध होते. संरक्षणमंत्री झाल्यावरदेखील त्यांनी शहराशी आपला जिव्हाळा जपला होता. ‘लोकमत कारगील शहीद निधी’द्वारे उभारलेल्या सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. यावेळी देशातील सैनिकांची मूठ मजबूतच हवी असे आग्रही प्रतिपादन करत त्यांनी देशवासीयंना भ्रष्टाचारविरोधात लढण्याचे आवाहन केले होते.

ठळक मुद्दे‘लोकमत कारगील शहीद निधी’द्वारे उभारलेल्या सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे केले होते भूमिपूजनदेशवासीयांना भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जॉर्ज फर्नांडिस यांचे उपराजधानीशी कार्यकर्ता जीवनापासून जुने ऋणानुबंध होते. संरक्षणमंत्री झाल्यावरदेखील त्यांनी शहराशी आपला जिव्हाळा जपला होता. ‘लोकमत कारगील शहीद निधी’द्वारे उभारलेल्या सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. यावेळी देशातील सैनिकांची मूठ मजबूतच हवी असे आग्रही प्रतिपादन करत त्यांनी देशवासीयंना भ्रष्टाचारविरोधात लढण्याचे आवाहन केले होते.२१ जून २००० रोजी सिव्हिल लाईन्स येथील हिस्लॉप महाविद्यालयाजवळील जागेत वसतिगृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. यावेळी तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री हरीन पाठक, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व तत्कालीन खासदार विजय दर्डा, तत्कालीन ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री तसेच ‘लोकमत’चे वर्तमान ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री वसुधाताई देशमुख, शिक्षण राज्यमंत्री अनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी झालेल्या जोशपूर्ण भाषणात जॉर्ज फर्नांडिस यांनी देशप्रेमाचे स्फुलिंग जागविले होते. स्वातंत्र्याची लढाई आपण का लढलो होतो, कुठली मूल्ये त्यामागे होती, सैनिक सीमेवर धारातिर्थी का पडत आहेत आणि आपण नेमके कुठे आहोत, असे प्रश्नच त्यांनी नागरिकांसमोर उपस्थित केले होते. सैनिकांचे, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान हे भ्रष्टाचार व अत्याचार मिटविण्यासाठी होते. वाईट कामे करणाऱ्यांना सूट देण्यासाठी नव्हते. सैनिक आपल्या देशाची मूठ आहे. ती मजबूत असलीच पाहिजे. अर्धांगवायू झालेले बाहू चालणार नाहीत. यासाठी देशाला भ्रष्टाचारमुक्त केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले होते.गणवेशात असलेल्या एका मेजरला कारगीलला जात असताना रेल्वे आरक्षणासाठी १०० रुपयांची लाच द्यावी लागल्याची घटना सांगत त्यांनी संपूर्ण सभागृहाला आत्मचिंतन करायला भाग पाडले होते. फर्नांडिस यांनी ‘लोकमत’च्या पुढाकाराचे विशेष कौतुकदेखील केले होते.

 

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिसLokmat Eventलोकमत इव्हेंट