शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

Corona Virus in Nagpur; मध्य नागपुरातील अनेक वस्त्या सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 21:15 IST

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्याने मध्य नागपुरातील मोठा परिसर सील करण्यात आला आहे. लोकांची ये-जा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांसह १५० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याने खळबळ डीसीपी माकणिकर यांच्या नेतृत्वात रुटमार्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्याने मध्य नागपुरातील मोठा परिसर सील करण्यात आला आहे. लोकांची ये-जा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांसह १५० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहे. झोन तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या परिसरात रुट मार्च करीत आहे.मध्य नागपुरातील तकिया परिसरात राहणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्याचा उपचार सुरु आहे. ही व्यक्ती व्यवसायानिमित्त दिल्लीत गेली होती. १५ मार्च रोजी ती नागपूरला परतली. ती शनिवारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यानंतर पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले. शनिवारी रात्री मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तकिया परिसरातील अनेक वस्त्या सील करण्याचे आदेश जारी केले. यानंतर पोलिसांनी मोर्चा सांभाळला आहे. मोमीनपुरा चौक ते टीमकी तीन खंबा चौक आणि भगवाघर चौक ते नालसाब चौक दरम्यानचा परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात दाट लोकवस्ती आहे. येथे हजारो लोक राहतात. या परिसरातील दाट लोकसंख्या आणि कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती उशिरा आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या परिसरातील मुख्य चौक आणि गल्लीबोळातील रस्त्यांवरही बॅरिकेड्स लावून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.सील करण्यात आलेल्या परिसरात अधिकाऱ्यांसह १५० वर अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी एसआरपीचे दोन सेक्शन आणि आरसीबी सुद्धा तैनात करण्यात आले आहे. झोन तीनचे डीसीपी राहुल माकणिकर शनिवारी दुपारपासूनच बंदोबस्ताचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात शनिवारी मोमीनपुरा आणि रविवारी टेका नाका परिसरात रुट मार्च करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे निर्देश देत सहकार्य करण्याचे आवाहनही करीत आहेत.बंदीतून वगळण्यात आलेल्या बाबीया परिसरातील सर्व रस्ते सील करण्यात आले असून रहदारीही बंद करण्यात आली आहे. परंतु या बंदीत नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष काळजी घेत या बंदीतून काही बाबी वगळल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचारी व अधिकारीआवश्यक तातडीची वैद्यकीय सेवा तसेच अंत्यविधी.वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथालॉजिस्ट इत्यादी.जीवनावश्यक वस्तूंचा सेवा पुरवठा करणारे व्यक्ती (पोलीस विभागामार्फत पास प्राप्त धारक)शहर पोलिसांच्या सेवेला सलामपोलीस आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करीत आहेत. सुरक्षा व्यवस्थेसोबतच ते लोकांना भोजन आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही करीत आहेत. कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करीत त्यांचा आत्मविश्वासही वाढवित आहेत. शनिवारी सुद्धा मुसळधार पावसातही पोलिसांनी रुट मार्च केला. पोलिसांच्या या सेवेला प्रत्येक नागरिक सलाम करीत आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे म्हणणे आहे की, कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच नागरिकांची सेवा करणेही पोलिसांचे कर्तव्य आहे. शहरातील प्रत्येक नागरिक त्यांचे कुटुंबीय आहे. नागरिकांनी प्रत्येक वेळेस पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यामुळे आताही तशाच सहकार्याची गरज असून नागरिकांनी आपापल्या घरीच राहून सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी केले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस