शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर महिलांच्या तपासणीसाठी नागपूर मनपाची विशेष चमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:00 IST

लॉकडाऊनमध्ये गरोदर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची वेळोवेळी तपासणी व आवश्यक लसीकरण करणे गरजेचे आहे. कोविडमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात गरोदर महिलांच्या संदर्भात संभाव्य धोके टाळण्यासाठी मनपाने त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष रुग्णवाहिका तयार केली आहे.

ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पनाविशेष रुग्णवाहिकेद्वारे रहिवासी क्षेत्रात सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमध्ये गरोदर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची वेळोवेळी तपासणी व आवश्यक लसीकरण करणे गरजेचे आहे. कोविडमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात गरोदर महिलांच्या संदर्भात संभाव्य धोके टाळण्यासाठी मनपाने त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष रुग्णवाहिका तयार केली आहे. या रुग्णवाहिकेद्वारे स्त्रीरोगतज्ज्ञ गरोदर महिलांच्या रहिवासी क्षेत्रात जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी शहरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा भागामध्ये चमूद्वारे गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.मनपाद्वारे शहरातील कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट प्रतिबंधित करण्यात आले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रतिबंधित क्षेत्रातील अतिधोकादायक गटातील व्यक्ती शोधण्यात आल्या आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून या ठिकाणच्या गरोदर महिला शोधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तपासणीसाठी या महिलांना कोणत्याही रुग्णालयात जाण्याची गरज नाही. त्या राहत असलेल्या ठिकाणी मनपाची चमू येईल व स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत आवश्यक त्या सर्व तपासणी केल्या जातील. गरोदर महिलांची रक्त, लघवी तपासणी किंवा लसीकरण आणि आवश्यक औषधोपचार या सर्व सुविधा मनपाद्वारे घरपोच देण्यात येत आहेत. रविवारी सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा भागात जाऊन येथील गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जन्माला येणाऱ्या बाळाला कोणताही धोका राहू नये, आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने मनपाद्वारे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सुरक्षितरीत्या ही चाचणी केली जात आहे. आई आणि होणाºया बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चाचणी होणे आवश्यक आहे. स्वत:ला आणि येणाºया बाळाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शहरातील सर्व ठिकाणच्या महिलांनी तपासणीसाठी पुढे यावे व मनपाच्या आरोग्य चमूला सहकार्य करावे, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.आरोग्य तपासणीसह घेणार ‘स्वॅब’गरोदर महिलांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी त्यांच्या आरोग्य तपासणीसह त्यांचा कोरोना चाचणीसाठी स्वॅबही घेण्यात येणार आहे. यासाठी महिलांना विलगीकरण कक्षात राहण्याची गरज नाही. स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह राहिल्यास त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. मात्र स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार केले जातील. अत्यंत सुरक्षितरीत्या हे स्वॅब घेण्यात येते. रुग्णवाहिकेमध्ये कोरोना स्वॅब घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्वॅब घेणारे डॉक्टरचे फक्त दोन्ही हात बाहेर येतात व चाचणी केली जाते.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस