शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी स्पेशल टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:11 AM

नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षित असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असली तरी निधी न मिळाल्याने रखडत चालले आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने ‘स्पेशल टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देप्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यासाठी समिती स्थापन : डॉ. निसवाडे, डॉ. कांबळे यांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षित असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असली तरी निधी न मिळाल्याने रखडत चालले आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने ‘स्पेशल टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव असून सहा सदस्यांमध्ये नागपूर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व मेडिकलच्या कर्करोग विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांचा समावेश आहे.वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रकल्पांचा बांधकाम व इतर प्रशासकीय मान्यता याकरीता दरमहा आढावा घेऊन त्याचा प्रगती अहवाल शासनस्तरावरून तपासण्याकरिता ‘स्पेशल टास्क फोर्स’ची स्थापना करण्याचा शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमुळे नागपूर मेडिकलचा कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रकल्पही मार्गी लागण्याची शक्यता बळावलीआहे२०१२ च्या हिवाळी अधिवेशनात मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. मात्र, तेव्हापासून हे इन्स्टिट्यूट अद्यापही कागदावरच आहे. या इन्स्टिट्यूटला घेऊन दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर, जून २०१७ मध्ये न्यायालयाने दोन वर्षांत कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारावे, असे निर्देश दिले आहेत. परंतु आता वर्षभराचा कालावधी होत असतानाही इन्स्टिट्यूटच्या बांधकामाला सुरुवातही झाली नाही. यासाठी निधी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपलब्ध करून देण्यालाही मान्यता मिळालीआहे. सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता झाली असताना इन्स्टिट्यूटच्या ‘ओपीडी’चा प्रस्ताव संसाधनासाठी होता. परंतु प्रस्तावात संसाधनाच्या जागी साधन खरेदी या नावाने प्रस्ताव मंजूर झाल्याने तो मागे पडला. यातच गेल्याच आठवड्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग व आदिवासी विकास विभाग यांच्या नियंत्रणाखाली अनुसूचित जाती व अनुसूचित जाती उपयोजनेतून २५ कोटी रुपये अनुदान कॅन्सर रुग्णांच्या उचपारासाठी महत्त्वाचे असलेल्या ‘लिनियर एक्सलेटर’या यंत्रासाठी देण्यात आले. विशेष म्हणजे, हे यंत्र कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी असल्याचा साधा उल्लेखही नाही. यामुळे कॅन्सर इन्स्टिट्यूटला घेऊन संशयाने पाहिले जात होते. तूर्तास मेडिकल प्रशासनाने हा निधी हाफकिन कंपनीकडे वळता केला आहे. याच निधीला बांधकामासाठी खर्च करण्यासाठी प्रयत्न होऊ घातले असताना, ‘स्पेशल टास्क फोर्स’ समिती स्थापन झाल्याने प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcancerकर्करोग