शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

बम्लेश्वरी माता जत्रेसाठी डोंगरगडला १० गाड्यांचा थांबा दपूम रेल्वेचे विशेष नियोजन

By नरेश डोंगरे | Updated: March 25, 2025 22:41 IST

चैत्र नवरात्रात डोंगरगडला मातेश्वरीची भव्य यात्रा भरते.

नरेश डोंगरेलोकमत नागपूर : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बम्लेश्वरी मातेच्या जत्रेनिमित्त दूरदूरचे भाविक डोंगरगडला येत असल्याचे ध्यानात घेऊन दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेने डोंगरगड स्थानकावर १० रेल्वे गाड्यांना थांबा घोषित केला आहे.

चैत्र नवरात्रात डोंगरगडला मातेश्वरीची भव्य यात्रा भरते. जत्रा कालावधीत तेथे देश-विदेशातून असंख्य भाविक दर्शनाला येतात. सर्वाधिक भाविक रेल्वे गाड्यांनी डोंगरगडला पोहचत असल्याचे लक्षात घेत दपूम रेल्वेने यावेळी ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत डोंगरगड स्थानकावर १० रेल्वे गाड्यांना तात्पुरता थांबा घोषित केला आहे.ट्रेन नंबर २०८४३ बिलासपूर - भगत की कोटी (रात्री ९.५६ वाजता डोंगरगड स्थानकावर येणार, ९.५८ ला प्रस्थान करणार), २०८४४ भगत की कोटी- बिलासपूर (पहाटे ५.४० वाजता येणार, ५.४२ ला पुढे जाणार), २०८४५ बिलासपूर -बिकानेर (रात्री ९.५६ ला येणार, ९.५८ ला मार्गस्थ होणार), २०८४६ बिकानेर-बिलासपूर (पहाटे ५.४० ला येणार, ५.४२ ला मार्गस्थ होणार), २०८५१ बिलासपूर मद्रास (दुपारी १२.१६ ला येणार, १२.१८ वाजता पुढे जाणार), २०८५२ मद्रास-बिलासपूर (सकाळी १० .३३ ला आगमन, १०.३५ ला प्रस्थान), १२८४९ बिलासपूर -पुणे (दुपारी २.३६ ला आगमन, २.३८ ला प्रस्थान), १२८५० पुणे -बिलासपूर(दुपारी १२.५ ला आगमन, १२.७ ला प्रस्थान), १२७७२ रायपूर-सिकंदराबाद (सायंकाळी ६.३० ला आगमन, ६.३२ ला प्रस्थान) आणि ट्रेन नंबर १२७७१ सिकंदराबाद रायपूर (सकाळी १०.४६ ला आगमन आणि १०.४८ ला प्रस्थान) या त्या १० रेल्वे गाड्या आहेत.गाड्यांचा विस्तार, स्पेशल ट्रेनही धावणार

याच कालावधीत ट्रेन नंबर ६८७४२/ ६८७४१ गोंदिया दुर्ग गोंदिया ही गाडी रायपूरपर्यंत धावणार आहे. तर, ट्रेन नंबर ६८७२९ रायपूर डोंगरगड रायपूर ही मेमू ट्रेन गोंदियापर्यंत धावणार आहे. ट्रेन नंबर ०८७०९/०८७१० डोंगरगड दुर्ग डोंगरगड तसेच ०८७०१/०८७०२ दुर्ग गोंदिया दुर्ग या दोन स्पेशल ट्रेनही उपरोक्त कालावधीत सेवा देणार आहेत.गाडी क्रमांक ६८७२१ रायपूर डोंगरगड मेमू, ६८७२३ डोंगरगड गोंदिया मेमू, ६८७२४ गोंदिया रायपूर, ६८७२९ रायपूर डोंगरगड आणि गाडी क्रमांक ६८७३० डोंगरगड रायपूर या सर्व मेमू ट्रेनचे संचालन नमूद कालावधीत केले जाणार आहे.अतिरिक्त कोच जोडणार

जत्रेदरम्यान प्रवाशांना पुरेशी जागा मिळावी म्हणून १२८५५ बिलासपूर इतवारी इंटरसिटी एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२२४० ईतवारी कोरबा शिवनाथ एक्सप्रेसला २८मार्च ते ६ एप्रिलपर्यंत गाडी क्रमांक १८२३९ कोरबा ईतवारी शिवनाथ एक्सप्रेसला २९ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत आणि गाडी क्रमांक १२८५६ इतवारी बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेसला ३० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत एक अतिरिक्त जनरल कोच जोडण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दपूम रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक बुकिंग स्टाफ, चेकिंग स्टाफसह सफाई कर्मचाऱ्यांनाही आवश्यक निर्देश दिले आहेत.