शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागा घटल्या, प्रवेशाचा टक्का वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 10:53 IST

यंदा जागा घटल्याने प्रवेशाचा टक्का वाढण्याची शक्यता असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. २०१४ सालापासून ६ वर्षांत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३५ हजारांहून अधिक जागा कमी झाल्या आहेत हे विशेष.

ठळक मुद्दे६ वर्षांत ३५ हजारांहून अधिक जागा घटल्या

योगेश पांडेनागपूर : अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नसली तरी महाविद्यालयांकडून तयारी करण्यात आली आहे. महाविद्यालयांपुढे कोरोनामुळे मोठे आव्हान उभे ठाकले असले तरी यंदा जागा घटल्याने प्रवेशाचा टक्का वाढण्याची शक्यता असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. २०१४ सालापासून ६ वर्षांत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३५ हजारांहून अधिक जागा कमी झाल्या आहेत हे विशेष.

२०१४-१५ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता प्रवेश क्षमतेत घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१४-१५ साली राज्यभरातील शासकीय, खासगी महाविद्यालयात मिळून १ लाख ७० हजार ५ इतक्या जागा होत्या. त्यानंतर सातत्याने जागांमध्ये घट होत गेली. विविध कारणांमुळे महाविद्यालयांतील तुकड्या किंवा शाखा कमी होत गेल्या. २०१८-१९ साली जागांचा आकडा १ लाख ४४ हजारांवर आला तर २०२०-२१ मध्ये १ लाख ३४ हजार ७७६ जागाच प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. सहा वर्षांतील टक्केवारी काढली तर राज्यभरात २०.७२ टक्के जागा घटल्या. मात्र यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा भर हा राज्यातीलच महाविद्यालयांत प्रवेशावर राहणार आहे. एकीकडे जागांचे प्रमाण कमी झाले असताना या स्थितीमुळे रिक्त जागांचे प्रमाणदेखील घटण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.- प्लेसमेंट वाढल्याचा फायदा होणार२०१४-१५ साली राज्यात ३८० महाविद्यालये होती. यंदाच्या शैक्षणिक सत्रात ३५४ महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. प्लेसमेंटचे प्रमाण काहिसे घटल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती व त्यामुळे काही महाविद्यालये बंद झाली. मात्र प्लेसमेंट वाढत असल्यामुळे विद्यार्थी परत अभियांत्रिकीकडे वळण्याची चिन्हे असून यंदा स्थिती बदललेली दिसेल असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय प्रभारी सहसंचालक डॉ. राम निबुदे यांनी व्यक्त केले,- १ लाख ३४ हजार जागांसाठी प्रवेशअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या आकडेवारीनुसार २०१९-२० मध्ये राज्यात अभियांत्रिकीच्या १ लाख ३५ हजार ३१२ जागा होत्या. २०१०-२१ मध्ये यात घट झाली असून यंदा १ लाख ३४ हजार ७७६ जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र