शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

काँग्रेसचा बालेकिल्ला दक्षिणही ढासळला

By admin | Updated: October 20, 2014 00:36 IST

दक्षिण नागपूर मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. भाजप लाटेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली आहे. प्रचारादरम्यान तगडे वाटणारे काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी

नागपूर : दक्षिण नागपूर मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. भाजप लाटेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली आहे. प्रचारादरम्यान तगडे वाटणारे काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा पराभव करीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी बाजी मारली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा ३० हजाराहून अधिक मतांनी विजय झाला होता. यावेळीही काँग्रेस बाजी मारेल म्हणून मागील निवडणुकीत पूर्व नागपूर मतदार संघात पराभूत झालेले चतुर्वेदी यांनी हनुमान उडी घेत दक्षिण मतदार संघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी दाखल केली. चतुर्वेदी तयारीनिशी निवडणुकीत उतरल्याने या मतदारसंघात चमत्कार घडवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु मतदारांनी त्यांना नाकारले. कोहळे यांनी एकतर्फी विजय मिळविला. त्यांनी चतुर्वेदी यांचा ४३२१४ मतांनी पराभव केला. झालेल्या १,८३२६३ मतदानापैकी कोहळेंना ८१,२२४ तर चतुर्वेदींना ३८०१० मते पडली. बसपाच्या सत्यभामा लोखंडे तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांना २३,१५६ मते मिळाली. शिवसेनेचे किरण पांडव व शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या मतदारसंघात पंचरंगी लढत होईल, असा अंदाज होता. परंतु सावरबांधे व पांडव लढतीतच नव्हते. पांडव यांना १३,८६३ तर सावरबांधे यांना १५,१०७ मते मिळाली. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने दीनानाथ पडोळे यांनी घड्याळचा गजर केला. परंतु त्यांच्या घड्याळीचे काटे ४१९४ मतांवर थांबले. सीताबर्डी येथील बचत भवनात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत सुधाकर कोहळे यांनी २५२८ मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत ३४१०, तिसऱ्या फेरीत ३३८१, चौथ्या फेरीत ४१०३, पाचव्या फेरीत १५५५ मतांची आघाडी मिळाल्याने या फेरीअखेरीस कोहळे यांची एकूण १४,९७७ मतांची आघाडी झाली होती. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत कोहळेंना आघाडी मिळत गेली. अखेरच्या १७ व्या फेरीअखेर कोहळे यांनी ४३२१४ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. या मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात होते. यातील अजित भाकरे, डॉ. यशवंत आंबटकर व राजू डबले यांना मतांची शंभरी पार करता आली नाही. चार उमेदवारांना दोनशेचा पल्ला गाठता आलेला नाही. यात वैभव पांडव, जीवन रामटेके, नामदेवराव कवडू व अब्दुल राजीक पटेल आदींचा समावेश आहे.बिंबिसार कांबळे यांना ३८३, सतीश शेंडे ३५१, अ‍ॅड. सुनील लाचेरवार ८४२ तर क्षितिज कांबळे यांना ५२५ मते मिळाली. डेमोक्रेटीक सेक्युलर पार्टीचे शकील पटेल यांना ३४०० मते मिळाली. (प्रतिनिधी)