शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  गिट्टीखदान शोभायात्रेत ‘जय हनुमान’चे स्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:39 IST

गिट्टीखदान येथे भोसलेकालीन हनुमान मंदिर आहे. या मंदिरातून हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. पालकमंंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, आ. प्रकाश गजभिये, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, नितीश ग्वालबन्सी, रमेश चोपडे, प्रगती पाटील, शिल्पा कांबळे-धोटे, मीना तिडके आदींच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर ‘पवनसूत हनुमान की जय’चा गजर करीत शोभायात्रा निघाली.

ठळक मुद्दे४४ वर्षांपासून निघतेय शोभायात्रा : भाविकांची गर्दी, प्रसाद वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गिट्टीखदान येथे भोसलेकालीन हनुमान मंदिर आहे. या मंदिरातून हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. पालकमंंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, आ. प्रकाश गजभिये, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, नितीश ग्वालबन्सी, रमेश चोपडे, प्रगती पाटील, शिल्पा कांबळे-धोटे, मीना तिडके आदींच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर ‘पवनसूत हनुमान की जय’चा गजर करीत शोभायात्रा निघाली.शोभायात्रेचे हे ४४ वे वर्षे आहे. शोभायात्रेत २१ चित्ररथ व देखाव्यांचा समावेश होता. आकर्षक रोषणाई लक्ष वेधून घेत होती. प्रभू श्रीराम, हनुमान यांच्या भजनाचे स्वर लाऊडस्पीकरमधून गुंजत होते. हनुमानजींची दोन फुटांची चांदीची तयार करण्यात आलेली मूर्ती लक्ष वेधून घेत होती. याशिवाय रामभजन करताना हनुमानजी व वानरसेना, सूर्यरथ, महालक्ष्मीपूजन करताना माता सरस्वती, श्रीक्षेत्र केदारनाथ दर्शन, तुळजाभवानी दर्शन, विष प्राशन करताना शंकरजी, राधा-कृष्ण, साईबाबा, महालक्ष्मी, राम वनवासात जात असतानाचा देखावा, संत गजानन महाराज, बद्रीनाथ दर्शन, भगवान तिरुपती बालाजी, भगवान श्रीकृष्ण रणांगणात अर्जुनाला उपदेश करताना एका हातावर पर्वत उचलणारे हनुमानजी, रामदेवबाबा असे देखावे साकारण्यात आले होते. शोभायात्रा गिट्टीखदान मंदिरातून निघून गोरेवाडा रोड, बोरगाव चौक, अनंतनगर मेनरोड, न्यू चोपडे लॉन, सीआयडी आॅफीस, काटोल रोड चौक, गिट्टीखदान पोलीस स्टेशन, गिट्टीखदान, फ्रेण्डस कॉलनी, जागृती कॉलनी, केटीनगरमार्गे परत गिट्टीखदान मंदिरात आली. शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी प्रसाद वितररण, सरबत, पाणी पाऊच वितरणाचे स्टॉल लावण्यात आले होते. होणारा कचरा लागलीच उचलण्यासाठी स्वयंसेवक सज्ज होते. विशेष म्हणजे शोभायात्रेमुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. गिट्टीखदान पोलिसांनी यासाठी सहकार्य केले.मंडळाचे सदस्य घनश्याम मांगे, अशोक डोर्लीकर, सूर्यनारायण ठाकूर, ब्रिजमोहन दिवाण, नंदू हिंगोरानी, हेमंत माहुरे, लखन वानखेडे, शशिकांत बोदड, नरेश बरडे, बबली तिवारी, कृष्णदत्त चौबे, राजू खंडेलवाल, हरीश नागपाल, राजेश पांडे, शीला माहुरे, पुरुषोत्तम मदने, धनराज तेलंग, कपिल मदने, कमलेश पांडे, सचिन पाली, अभय वैद्य आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :Hanuman Akhadaहनुमान आखाडाnagpurनागपूर