शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सोनू सूदची दरियादिली, नागपुरातील कोरोनाग्रस्त मुलगी हैदराबादला एअरलिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 05:02 IST

ट्विटरवरून मागितली होती मदत; दुसऱ्या लाटेतही सामाजिक वसा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतर करणाऱ्या कामगारांना मदतीसाठी सरसावलेल्या अभिनेता सोन सूदने आपला सामाजिक वसा दुसऱ्या लाटेतही कायम ठेवला आहे. ट्विटरवरून मदत मागणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाला नागपुरातून थेट हैदराबादला एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून एअरलिफ्ट करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. विशेष म्हणजे मागील शनिवारी सोनूला कोरोनाची बाधा झाली होती व नुकताच त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

नागपुरातील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली व तिच्या फुप्फुसांमध्ये ८५ ते ९० टक्के संसर्ग झाला. सोनू सूदला यासंदर्भात ट्विटरवर संपर्क साधला असता त्वरित त्याने सूत्रे हलविली. अगोदर तिला नागपुरातील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले; परंतु तिची स्थिती पाहता तातडीने फुप्फुसाचे प्रत्यारोपण करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर सोनू सूदने हैदराबाद येथील एका मोठ्या इस्पितळात तिला एअरलिफ्ट करण्याची व्यवस्था केली. त्या इस्पितळात ईसीएमओ म्हणजेच फुप्फुसांवरील ताण हटविण्यासाठी रक्त कृत्रिमपणे शरीरात टाकण्याची व्यवस्था आहे. संबंधित रुग्णाच्या वाचण्याची शक्यता २० टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व तरीदेखील एअरलिफ्ट करण्याची तयारी आहे अशी विचारणा केली. ती २५ वर्षांची तरुण मुलगी असून, ती नक्कीच यातून बाहेर येईल हा विश्वास असल्याने मी तिच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला. तिच्यावर उपचार सुरू असून, लवकरच चांगली बातमी कळेल, असे सोनू सूदने सांगितले.

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदcorona virusकोरोना वायरस बातम्या