शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गान‘सरस्वती’ला नागपूरकरातून ‘रेकार्डब्रेक’ मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:38 IST

नागपूर शहरातील हार्मोनी इव्हेंट्स या संगीत संस्थेच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी लतादीदींच्या ९० व्या वाढदिवशी एकाच वेळी ९० ठिकाणी संगीतमय मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देहार्मोनी इव्हेंट्सतर्फे जन्मदिनी ९० कार्यक्रम : इंग्लंडमध्येही आयोजन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळापासून हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधून आपल्या अलौकिक स्वरांनी कोट्यवधी देशवासीयांना स्वर्गीय व ईश्वरीय आनंद प्रदान करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर या येत्या २८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९० व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. हिंदी चित्रपटसंगीताचे सुवर्णयुग साकारण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या लतादीदींच्या सुमधूर आवाजातील हजारो गाणी म्हणजे तमाम रसिकांच्या मर्मबंधातील ठेव आहेत. भारतीयांसाठी अमूल्य भेट असलेल्या या गानकोकिळेचा जन्मदिन साजरा करण्यासाठी त्यांचे चाहते सरसावले आहेत. नागपूरकर चाहतेही त्यासाठी सरसावले असून या लाडक्या गायिकेला मानवंदना देताना थेट विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची तयारी सुरू केली आहे.शहरातील हार्मोनी इव्हेंट्स या संगीत संस्थेच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी लतादीदींच्या ९० व्या वाढदिवशी एकाच वेळी ९० ठिकाणी संगीतमय मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हार्मोनीचे संचालक राजेश समर्थ यांच्या संकल्पनेतून ‘सरस्वती’ हा कार्यक्रम आकाराला आला आहे. समर्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश भट सभागृहातील प्रमुख कार्यक्रमासह नागपूर शहरात ६० ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय पुण्यातील ९ कार्यक्रमांसह उर्वरित महाराष्ट्रात २९ ठिकाणी सरस्वती या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रत्येक कार्यक्रमात स्थानिक कलावंतांना सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. हार्मोनीतर्फे माटुंगा, मुंबई येथे उषा मंगेशकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. एक विशेष कार्यक्रम याच दिवशी इंग्लंडमध्येही होणार असल्याचे समर्थ यांनी सांगितले. विशेष म्हणजे एकाच वेळी ७३ ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा विश्वविक्रम युकेमधील संस्थेने नोंदविला आहे. लतादीदींच्या जन्मदिनी होणाऱ्या सरस्वती या कार्यक्रमाद्वारे हा विक्रम मोडित काढून नवा गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकार्ड स्थापित होणार असल्याचा विश्वास राजेश समर्थ यांनी व्यक्त केला. या विक्रमी आयोजनात शेफ विष्णू मनोहर, निवेदिका श्वेता शेलगावकर, मनीष पाटील, विजय जथे, दीपाली सप्रे, भास्कर वागुले, मनोज पिदडी, सुनील बोंबले व कर्नल वानखेडे यांचा सहभाग आहे.इतर महत्त्वाचे कार्यक्रमलता मंगेशकर यांना मानवंदना देणारे विविध कार्यक्रम शनिवारी शहरात आयोजित करण्यात आले आहेत. याअंतर्गत सूरसप्तकतर्फे २८ सप्टेंबरपासून लता संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे सायंकाळी ६ वाजता लतादीदींच्या हिंदी गीतांवर आधारित ‘तुम जियो हजारो साल’ या कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होईल. २९ रोजी ‘स्वरलते, तुज मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यात त्यांच्यावर सुचित्रा कातरकर यांनी रचलेली व गायलेली मराठी गीते सादर केली जाणार आहेत. याशिवाय सूरसंगम नाशिक, चेरी बेरी लाईव्ह मुंबई आणि दि गोल्डन व्हाईस स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात ‘अभिनेत्री’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यात लता मंगेशकर यांनी ७० अभिनेत्रींसाठी गायिलेली गाणी सादर केली जाणार आहेत.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरmusicसंगीतnagpurनागपूर