लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीवर चाकूहल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीच्य हातातील चाकू त्याच्या १२ वर्षाच्या मुलाला लागला. त्यामुळे मुलगा जबर जखमी झाला. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास जरीपटक्यातील लुर्द माता नगरात ही घटना घडली. जेकब नरेश पायटो असे जखमी मुलाचे नाव आहे.आरोपी नरेश रघू पायटो हा दारुड्या आणि भांडखोर आहे. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास त्याने घरात गोंधळ सुरू केला. मुलगा जेकबला त्याने मारहाण केली. त्यामुळे मुलाची आई इंदिरा (वय ३८) हिने आरोपीला हटकले. परिणामी मुलाला सोडून आरोपी नरेश पायटोने पत्नी इंदिरासोबत वाद सुरू केला. एवढेच नव्हे तर घरातील भाजी कापायचा चाकू आणून त्याने इंदिराकडे धाव घेतली. आईला वडील चाकू मारणार हे ध्यानात आल्याने मुलगा जेकबने मध्ये पडून वडिलाला थांबवण्याचा प्रयत्न केला. झटापटीत आरोपीच्या हातातील चाकू जेकबच्या पोटाला लागला. त्यामुळे तो जबर जखमी झाला. दरम्यान, आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी आरोपी पायटोला कसेबसे आवरले. जखमी जेकबला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंदिरा पायटो यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी नरेश पायटोविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
पत्नीला चाकू मारण्याच्या प्रयत्नात आरोपीकडून मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:52 IST
पत्नीवर चाकूहल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीच्य हातातील चाकू त्याच्या १२ वर्षाच्या मुलाला लागला. त्यामुळे मुलगा जबर जखमी झाला. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास जरीपटक्यातील लुर्द माता नगरात ही घटना घडली.
पत्नीला चाकू मारण्याच्या प्रयत्नात आरोपीकडून मुलगा जखमी
ठळक मुद्देजरीपटक्याच्या लुर्दमातानगरातील घटना