शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कहीं दूर जब दिन ढल जाये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:36 IST

स्वत:च्या आयुष्याशी बोलताना, काहीतरी गुणगुणताना सुवर्ण काळातील संवेदनशील गाणी सहजच ओठांवर येतात. ‘काहीं दूर जब दिन ढल जाये..., कईं बार युंही देखा है..., जब कोई बात बिगड जाये...’ अशी काही मर्मस्पर्शी गीते आयुष्याचा अर्थ उलगडणारी वाटतात. अशी भावस्पर्शी व काही हलक्याफुलक्या गीतांचा चिंब करणारा अनुभव नागपूरकर रसिकांनी घेतला.

ठळक मुद्देरसिकांनी अनुभवल्या गोल्डन मेलोडीज : सिद्धिविनायक पब्लिसिटीचे आयोजन

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या आयुष्याशी बोलताना, काहीतरी गुणगुणताना सुवर्ण काळातील संवेदनशील गाणी सहजच ओठांवर येतात. ‘काहीं दूर जब दिन ढल जाये..., कईं बार युंही देखा है..., जब कोई बात बिगड जाये...’ अशी काही मर्मस्पर्शी गीते आयुष्याचा अर्थ उलगडणारी वाटतात. अशी भावस्पर्शी व काही हलक्याफुलक्या गीतांचा चिंब करणारा अनुभव नागपूरकर रसिकांनी घेतला.निमित्त होते श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीतर्फे आयोजित ‘गोल्डन मेलोडीज’ या कार्यक्रमाचे. सिद्धिविनायकचे समीर पंडित यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम बुधवारी वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. सिनेसंगीताच्या भावबंधातील ही मैफिल नागपूरच्या प्रथितयश गायकांनी सजविली. व्हॉईस ऑफ मुकेश म्हणून प्रसिद्ध अरविंद पाटील, व्हॉईस ऑफ किशोरदा म्हणून ओळखले जाणारे सागर मधुमटके तसेच सारंग जोशी, श्रेया खराबे, सोनाली दीक्षित व युवा गायिका शिवानी जोशी या गायक कलावंतांनी त्यांच्या सुमधूर स्वरांनी ही बहारदार मैफिल सजविली. सारंग यांनी ‘सुरमई अखियों से...’ या गीताने सुरुवात केल्यानंतर सोनाली यांनी ‘ये कहां आ गये हम...’ या गीतातून भावनांना स्पर्श केला. पुढे अरविंद पाटील यांनी ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार..., कभी कभी मेरे दिल मे..., चंदन सा बदन..., कहीं दूर जब दिन ढल जाये..., जो तुमको हो पसंद वहीं बात.. चाँद को क्या मालुम..., क्या खूब लगती हो..., दिल की नजर से...’ अशी लोकप्रिय गीते सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. ‘बचना ऐ हसिनो...’ म्हणत सागरने एन्ट्री केली आणि पुढे ‘रूक जाना नही..., जब कोई बात बिगड जाये..., ये दोस्ती हम नही तोडेंगे..., तुम जो मिल गये हो...’ ही गाणी मस्तीभऱ्या अंदाजात सादर केली.या गायकांनी ‘ना मांगू सोना चांदी..., झुठ बोले कौआ काटे..., ये रात भिगी भिगी..., एक चतुर नार..., आजा आजा मै हू प्यार तेरा..., डम डम डिगा डिगा..., ये मेरा दिल प्यार का दिवाना..., यम्मा यम्मा...’ अशी काही हलक्याफुलक्या अंदाजातील गाणी मधुरपणे सादर करून कार्यक्रमात रंगत भरली. अरविंद यांच्या ‘जिना यहां मरना यहां...’ या गीताने कार्यक्रमाची सांगता केली.गायक कलावंतांसह सिंथेसायजरवर राजा राठोड, गिटार गौरव टांकसाळे, तबला प्रशांत नागमोते, ढोलक अशोक टोकलवार, व्हायोलिन अमर शेंडे, ड्रम्स राजू गजभिये आणि ऑक्टोपॅडवर नंदू गोहाने यांचा सहभाग होता. निवेदन डॉ. मनोज साल्पेकर यांचे होते. कार्यक्रमात प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, न्यायमूर्ती हक, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, रवींद्र दुरुगकर, गिरीश गांधी, बाबुराव तिडके प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर