शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपुरात लॉकडाऊनमध्ये गुरुवारपासून काही अंशी शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 21:15 IST

राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून आज १४ मेपासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने वेगवेगळ्या दिवशी सुरू राहतील.

ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश :ऑनलाईन मद्यविक्री, कुलर, चष्मे, हार्डवेअर दुकाने सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून आज १४ मेपासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने वेगवेगळ्या दिवशी सुरू राहतील.नागपुरात ऑनलाईन मद्यविक्री राज्य शासनाने ११ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सुरू होईल. प्रतिबंधित क्षेत्रातून किंवा क्षेत्रात मद्यविक्रीला किंवा मद्य ऑनलाईन पद्धतीने मागविण्यास परवानगी राहणार नाही. आयुक्तांच्या जारी आदेशानुसार नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियरी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालये ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील.प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे, ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहतील. जिल्ह्यांतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे ज्या-ज्या बाबी सुरू करण्यास मुभा दिली आहे, त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज राहणार नाही. हा आदेश म्हणजेच परवानगी समजण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे. हे सुरू करताना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावे लागतील. फि जिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर या गोष्टी बंधनकारक राहतील.लॉकडाऊन काळात नागपूरकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केल्यास लवकरच सर्व सेवा सुरू करता येतील, असे तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.हे राहणार सुरूकेवळ परवानगी असणाऱ्या कामासाठी वैयक्तिक गाड्यांचा वापर.एका कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.दोन चाकी गाडीवर सहप्रवासी बसण्यास परवानगी नाही.आवश्यक सामग्रीचे उत्पादन जसे औषधी, मेडिकल उपकरणे, त्यासाठी लागणारे साहित्य.नियमित सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारे प्रोडक्शन युनिट आणि वितरण व्यवस्था.आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन.नागरी क्षेत्रात जेथे बांधकाम स्थळांवरच कामगार उपलब्ध असतील तेथील बांधकाम (प्रतिबंधित परिसर सोडून इतर परिसरातील नवनिर्मित बांधकामांसाठी वेळोवेळी परवानगी दिली जाईल.)कोविड-१९ च्या नियमानुसार जीवनावश्यक सामग्रीची दुकाने आणि बाजारसंकुल.प्रतिबंधित परिसरात फक्त जीवनावश्यक सामग्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता दरम्यान सुरू राहतील.इलेक्ट्रिकल सामग्रीची दुकाने, कुलर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार).ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार)ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियरी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार)ऑनलाईन मद्यविक्रीई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण)खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीतसर्व शासकीय कार्यालये (३० टक्के उपस्थितीत)मान्सूनपूर्व सर्व कामे२० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येईल.हे राहणार बंदसर्व देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा (मेडिकल सर्व्हिसेस आणि एअर अ‍ॅम्ब्युलन्स वगळून)प्रवासी रेल्वेगाड्या (गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गाड्या वगळून)आंतरराज्यीय प्रवासी बस वाहतूक (शासनाची परवानगी असलेल्या वगळून)मेट्रो रेल्वे सेवासर्व शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग (ऑनलाईन वर्गांना परवानगी राहील)सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जलतरण हौद आदीसर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रमसर्व धार्मिक स्थळेसायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षाटॅक्सी आणि कॅब सेवाजिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील बससेवासलून आणि स्पासेझ, औद्योगिक वसाहती, निर्यात करणारे उद्योग.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढे