शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील नागरिकांचे होणार समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:05 IST

दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे२८ व २९ रोजी  येथे समाधान शिबिर : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनअर्ज स्वीकारणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी हैद्राबाद हाऊस येथे आयोजित पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित असलेले प्रश्न थेट संबंधित विभागांकडून सोडविण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग या शिबिरात मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना प्रत्येक वॉर्डातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न व प्रलंबित कामे समाधान शिबिराच्या माध्यमातून सोडविण्याची सूचना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. हैद्र्राबाद हाऊस येथे विभागनिहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. १८ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. प्राप्त झालेले अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्यात येऊन २५ एप्रिलपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर कारवाई होऊन २८ व २९ एप्रिल रोजी आयोजित समाधान शिबिरामध्ये प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.पत्रपरिषदेत महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, संदीप जोशी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आशा पठाण आदी उपस्थित होते.या विभागांशी संबंधित तक्रारी अर्ज स्वीकारणारसमाधान शिबिरामध्ये नागपूर महानगरपालिका संबंधित सर्व विभागाशी असलेले अर्ज अथवा तक्रारी, नागपूर सुधार प्रन्यास, पुरवठा विभाग, अन्न सुरक्षा योजना, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, वीज वितरण कंपनी, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ (म्हाडा), प्रादेशिक परिवहन कार्यालय, समाज कल्याण, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार मंडळ, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विभाग, पोलीस विभाग, मतदार नोंदणी, जिल्हा महिला व बाल विकास, जात पडताळणी समिती, जिल्हा अग्रणी बँक, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी विभागांमार्फत जनतेला उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवे संबंधात असलेल्या तक्रारींची सोडवणूक करण्यात येणार आहे.आधार कार्डसाठी एक दिवस विशेष समाधान शिबिर दोन दिवसाचे असले तरी आधार कार्ड संबंधित कामांसाठी एक दिवस आणखी वाढवण्यात येणार आहे. ३० एप्रिलपर्यंत हे शिबिर चालेल.इतर विधानसभा मतदार संघातही होणार शिबिरसमाधान शिबिराचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात विधानसभानिहाय समाधान शिबिर पार पडले. दुस ऱ्या  टप्प्यात दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघापासून याची सुरुवात होत आहे. यानंतर इतर विधानसभा मतदार संघातही अशी शिबिरे घेतली जातील, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.१४ एप्रिल रोजी मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन योजना पोहोचवणारशासनाच्या मागासवर्गीयांसाठी विविध योजना आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीnagpurनागपूर