शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सोनेगावात निवृत्त अधिकाऱ्याकडे दरोडा

By admin | Updated: August 30, 2015 02:32 IST

सेवानिवृत्त अधिकारी आणि त्याच्या परिवारातील सदस्यांना गंभीर जखमी केल्यानंतर तब्बल सव्वातीन तास ओलिस ठेवणाऱ्या दरोडेखोरांनी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम,...

नागपूर : सेवानिवृत्त अधिकारी आणि त्याच्या परिवारातील सदस्यांना गंभीर जखमी केल्यानंतर तब्बल सव्वातीन तास ओलिस ठेवणाऱ्या दरोडेखोरांनी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, दागिने आणि अन्य मौल्यवान चिजवस्तूंसह दोन लाखांचा ऐवज लुटून नेला. शनिवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली. वृत्त लिहिस्तोवर कोणताही आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नव्हते. ओलिस ठेवून गंभीर जखमी करून दरोडेखोराच्या निर्दयतेला बळी पडून जबर जखमी झालेल्यांमध्ये बाळकृष्ण मोगरे (वय ६५) त्यांची पत्नी आणि मुलीचा समावेश आहे. मोगरे केंद्रीय आरोग्य विभागाचे निवृत्त अधिकारी असून, त्यांच्या पत्नी लता यासुद्धा निवृत्त शिक्षिका आहेत. नेहमीप्रमाणे मोगरे परिवार पावनभूमी (सोनेगाव) परिसरातील त्यांच्या ‘पितृसुगंध’ या निवासस्थानी झोपले होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर (१.३० च्या सुमारास) किचनच्या खिडकीचे गज कापून एक्झास्ट फॅन काढल्यानंतर पाच ते सहा दरोडेखोर मोगरे यांच्या निवासस्थानात आले. मोगरे यावेळी किचन लगतच्या शयनकक्षात झोपून होते. त्यांच्या बाजूच्या रूममध्ये पत्नी लता आणि मुलगी मयूरी झोपल्या होत्या. पाऊस सुरू असल्यामुळे दरोडेखोर घरात शिरल्याचे मोगरे कुटुंबीयांना कळलेही नाही. प्रारंभीच दरोडेखोरांनी मोगरेंच्या तोंडावर कापड बांधून त्यांचे हातपाय बांधले. आरडाओरड करताच जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले. दरोडेखोरांनी मारला चाकू नागपूर : मोगरेंचा आवाज ऐकून पत्नी लता आणि मुलगी मयूरी धावत आल्या. त्या ओरडत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांना चाकूने मारून जबर दुखापत केली. त्यांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत डांबण्यात आले. त्यानंतर बाजूच्या खोलीतील तक्षू नामक मुलीला चाकू, तलवारचा धाक दाखवून गप्प करीत दरोडेखोरांनी पुढचे सव्वातीन तास मोगरेंच्या निवासस्थानात अक्षरश: हैदोस घातला. पहाटे ४.४५ पर्यंत घरातील कानाकोपरा हुडकून दरोडेखोरांनी रोख २० हजार, मंगळसूत्रासह आणखी काही दागिने, लॅपटॉप, मोबाईल असा एकूण १ लाख, ९० हजारांचा ऐवज घेऊन पळ काढला. (प्रतिनिधी)शेजाऱ्यांनी केली सुटकादरोडेखोर बाहेरचे दार बंद करण्यासोबतच ओरडल्यास आम्ही येथेच आहोत असे सांगून गेले होते. त्यामुळेही मदतीसाठी ओरडण्याची मोगरे कुटुंबीयांची हिंमत झाली नाही. दरम्यान, सकाळच्या वेळी शेजारी मोगरेंच्या आवारातील फुलं तोडायला आली. खिडकीतून त्यांचा आवाज आल्यामुळे जखमी मोगरेंनी त्यांना मदतीची याचना केली. त्यानंतर शेजारी गोळा झाले. मोगरे कुटुंबीयांना त्यांनी धीर देत पोलिसांना कळविले. त्यानंतर सोनेगावचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. जखमी मोगरे कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी मानसिक धक्क्यातून ते अजून सावरलेले नाही. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी दरोड्यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.