शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिक संशोधनातून समाजाचा उद्धार : शेखर मांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 22:39 IST

वैज्ञानिक आपल्या संशोधनाच्या माध्यमातून समाजाच्या उद्धारासाठी काम करतात. हाच विचार समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी कोलकाता येथे ५ नोव्हेंबरपासून ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे५ नोव्हेंबरपासून ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’चे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैज्ञानिक केवळ प्रयोगशाळेत काम करतो व त्याचे केस विखुरलेले असतात. त्यांचे समाजाशी ऋणानुबंध नसतात, अशी समाजात धारणा असते. परंतु प्रत्यक्षात असे चित्र अजिबात नाही. लोकांच्या सहकार्याच्या आधारावरच संशोधन होतात. वैज्ञानिक आपल्या संशोधनाच्या माध्यमातून समाजाच्या उद्धारासाठी काम करतात. हाच विचार समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी कोलकाता येथे ५ नोव्हेंबरपासून ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. याच्याच शृंखलेत ‘नीरी’ येथे १८ ऑक्टोबर रोजी ‘पब्लिक आऊटरिच’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘सीएसआयआर’चे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली. ‘नीरी’ येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.यावेळी ‘नीरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार व वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे उपस्थित होते. ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत कोलकाता येथे हा ‘फेस्टिव्हल’ होणार आहे. हे अशाप्रकारचे पाचवे आयोजन आहे. प्रत्येक मतदारसंघातून ५ ते १० गुणवंत विद्यार्थ्यांनादेखील यात पाठवावे असे खासदारांना आवाहन करण्यात आले आहे, असे डॉ. मांडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति आवड कमी होत आहे. या क्षेत्रात रोजगार वाढेल तेव्हाच विद्यार्थी या विषयाकडे वळतील. यामुळे विज्ञानाला रोजगारपूरक बनविण्यावर भर देण्यात येत आहे. ‘सायन्स फेस्टिव्हल’ हा एका पद्धतीने विज्ञानाचा कुंभमेळाच आहे. याअंतर्गतच ‘नीरी’त १८ ऑक्टोबर रोजी ‘पब्लिक आऊटरिच’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नीरी’, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन राहणार आहे, असे डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले. चर्चेच्या अगोदर डॉ. मांडे यांनी ‘नीरी’तील स्मृतिवनाचे उद्घाटन केले.फटाके कंपन्यांकडून ‘ग्रीन’ फटाके तंत्रज्ञानाचा उपयोग‘नीरी’ने ‘ग्रीन’ फटाके विकसित केले आहे. यामुळे ३० ते ४० टक्के कमी प्रदूषण होते. या तंत्रज्ञानाचा फटाके उत्पादक कंपन्यांनी यावर्षी उपयोग केला आहे. यावर्षी हे फटाके सर्वत्र उपलब्ध होतील, असे डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानnagpurनागपूरMediaमाध्यमे