शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील समाज वैचारिकदृष्ट्या जखमी : डॉ. सूरज येंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:22 IST

देशातील विविध समाज हा आपल्यापुरता मर्यादित झाला असल्याने तो वैचारिकदृष्ट्या जखमी झाला आहे. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या देश तुटत चालला आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा आहे.

ठळक मुद्देइंडिया फॉर डायव्हर्सिटी : विविध समाजात संवाद घडविण्याचा प्रयत्न

ऑनलाईन लोकमत नागपूर : देशातील विविध समाज हा आपल्यापुरता मर्यादित झाला असल्याने तो वैचारिकदृष्ट्या जखमी झाला आहे. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या देश तुटत चालला आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी विविध समाजांमध्ये संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने काही तरुणांनी एकत्र येऊन इंडिया फॉर डायव्हर्सिटी (आयएफडी) हे अभियान सुरू केले आहे.हॉर्वर्ड विद्यापीठाचे संशोधक व या अभियानाचे प्रमुख डॉ. सूरज येंगडे हे शनिवारी नागपुरात आले होते. नागपुरातही त्यांनी विविध सामाजिक संघटना व विद्यार्थ्यांशी यासंबंधात संवाद साधला. दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना डॉ. येंगडे यांनी सांगितले, आपल्या देशात खूप विविधता आहे. जात, धर्म, लिंग, भाषा, वर्ग आदींबाबत विविधता आहे. या विविधतेतून भेदभाव निर्माण झाला आहे. तो अमूक धर्माचा. तो अमूक जातीचा अशी विभागणी झाली आहे. त्यांच्यातील संवादही बंद झालेले आहेत. त्यांच्या एकमेकांबद्दल ज्या भावना आहेत, त्या केवळ ऐकीव आहेत. त्यातून अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. या प्रत्येकाची राष्ट्राबद्दलची कल्पनाही वेगवेगळी आहे. प्रत्येक वर्ग, प्रत्येक धर्म राष्ट्राला आपल्या नजरेने पाहतो त्यामुळे देशभक्तीबद्दल प्रत्येकाचे स्वत:चे विचार आहेत. एका धर्माचे विचार दुसऱ्या  धर्मातील लोक वेगळ्या नजरेने पाहतात. हे केवळ एकमेकांशी संवाद नसल्याने होत आहे. त्यामुळे समाजात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. त्यात एकवाक्यता नाही. ही एकवाक्यता संविधानाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. म्हणून इंडिया फॉर डायव्हर्सिटी हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. आपली विविधता कायम ठेवून एकमेकांशी संवाद व्हावा आणि एकमेकांबद्दल असलेला द्वेष प्रेमाने दूर करावा, हा याचा मुख्य उद्देश आहे.विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती आवश्यकआयआयटी मुंबई येथून या अभियानाची सुरुवात झालेली आहे. नांदेड व इतर काही शहरांमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. सुरुवातीला देशातील ८ राज्यांमधील १६ शहरांमध्ये पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. या अभियानांतर्गत विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यात येत असला तरी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याशी संवादावर अधिक भर दिला जात आहे. कारण येणाऱ्या  समाजाचे व देशाचे नेतृत्व ते करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक जागृती होणे आवश्यक आहे, असेही डॉ. येंगडे यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर