शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

.... तर, राज्यातील २२ जिल्ह्यांना जाणवू शकतो क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 07:30 IST

Nagpur News २२ जिल्ह्यांना औषधीचा पुरवठा करणाऱ्या नागपुरातील राज्य औषधी भांडाराची इमारतच मोडकळीस आल्याने व तातडीने जागा उपलब्ध न झाल्यास, पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआरोग्यसेवा राज्य औषधी भांडाराची इमारत पाडणार

सुमेध वाघमारेनागपूर : राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूरच्या राज्य औषधी भांडाराची इमारत मोडकळीस आल्याने, बांधकाम विभागाने इमारत पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापूर्वी भांडाराला नवीन जागा उपलब्ध न झाल्यास, २२ जिल्ह्यांना होणारा क्षयरोग औषधांचा पुरवठा ठप्प होण्याची दाट शक्यता आहे.जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगाच्या एकूण रुग्णांपैकी २६ टक्के रुग्ण भारतात आढळतात. त्यापैकी ७० टक्के रुग्ण १५ ते ५४ वयोगटांतील आहेत. महाराष्ट्रात २०१७ मध्ये क्षयरोगाचे १,६४,७४३ रुग्ण होते. आता हा आकडा ३ लाखांजवळ पोहोचला आहे. क्षयरोग हा औषधोपचाराने बरा होणारा आजार आहे. यासाठी सरकार रुग्णांना मोफत औषधी, मोफत तपासणी, रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवास भत्ता व निक्षय पोषण योजनेतून दरमहा ५०० रुपये खात्यात जमा करते. नऊ महिन्यांपासून ते दीड वर्षापर्यंत क्षयरोगावर औषधोपचार आवश्यक ठरतो. औषधी मध्येच बंद केल्यास शरीरातील जंतू टीबीच्या औषधांना पुन्हा दाद देत नाहीत. यामुळे क्षयरोगाच्या रुग्णांसाठी नियमित औषधी महत्त्वाची ठरते, परंतु २२ जिल्ह्यांना औषधीचा पुरवठा करणाऱ्या नागपुरातील राज्य औषधी भांडाराची इमारतच मोडकळीस आल्याने व तातडीने जागा उपलब्ध न झाल्यास, पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे.-२०११ पासून औषधी पुरवठामेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात २०११ पासून राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूरच्या वतीने आरोग्यसेवाच्या राज्य औषधी भांडारातून विदर्भासह, मराठवाड्यातील जिल्ह्यांना डॉट प्लस औषधांचा पुरवठा केला जातो. मेडिकलने नियमानुसार नुकतेच टीबी वॉर्ड परिसरातील इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. त्यात मेडिकलचे क्षयरोगाचे वॉर्ड, ओपीडीसह राज्य भांडाराची इमारत मोडकळीस आल्याचे स्पष्ट केले आहे.- जागनाथ बुधवारी किंवा मनोरुग्णालयात होऊ शकते भांडारमेडिकलच्या बांधकाम विभागाने आरोग्य विभागाला औषधी भांडाराची इमारत पाडण्याच्या सूचना केल्या आहेत. याला गंभीरतेने घेत, औषधी भांडाराचे अधिकारी पयार्यी जागेचा शोध घेत आहेत. एका अधिकाऱ्यांने सांगितले, जागनाथ बुधवारी येथील जिल्हा क्षयरोग केंद्र किंवा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर बांधकाम करून, तिथे राज्य औषधी भांडार स्थानांतरित करता येऊ शकते, परंतु यासाठी वरच्या स्तरावर तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्य