शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

संघमित्रा एक्स्प्रेसमधून सोन्याची तस्करी; आंध्र प्रदेशातील आरोपींकडून बिस्किटे जप्त

By नरेश डोंगरे | Updated: October 25, 2024 21:11 IST

६१ लाख ४५ हजारांचे सोने : आरपीएफच्या सीआयबी तसेच डीआरआयची कारवाई

नरेश डोंगरे नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीआयबी) तसेच महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) संघमित्रा एक्स्प्रेसमधून केल्या जाणाऱ्या सोन्याच्या तस्करीचा भांडाफोड केला. नागपूर रेल्वे स्थानकावर तपासणी करून रेल्वेतून ७८७.८६ ग्रॅम सोन्याची बिस्किटे जप्त करून एकाला अटक करण्यात आली. या जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या बिस्किटांची किंमत ६१ लाख ४५ हजार ३०८ रुपये असल्याचे समजते.

गाडी क्रमांक १२२९६ संघमित्रा एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती डीआरआयचे वरिष्ठ अधिकारी व्ही. एल. नरसिम्हा यांना दोन दिवसांपूर्वी मिळाली होती. त्याची दखल घेत त्यांनी आपल्या चमूला तसेच आरपीएफच सीआयबीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संघमित्रा एक्सप्रेसवर नजर रोखली. ठराविक वेळेनुसार, संघमित्रा एक्सप्रेस येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर येताच नरसिम्हा यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक गाैरव मेश्राम तसेच आरपीएफच्या सीआयबीचे सहायक निरीक्षक राजकुमार भारती, मुकेश राठोड, अजय सिंह, जसवीर सिंह, हरविंदर सिंह आणि शाम झाडोकर यांच्या पथकाने गाडीत शिरून कसून तपासणी केली.

कोच नंबर एकच्या ३५ नंबरच्या बर्थवर बसून असलेल्या प्रवाशाचा संशय येताच त्याची चाैकशी करण्यात आली. तपासणीत त्याच्या बॅगमध्ये ७८७.८६ ग्राम सोन्याची बिस्किटे सापडली. ती कुठून आली, त्याबद्दल तोउलटसुलट माहिती देऊ लागला. आरोपी चित्तूर, आंध्र प्रदेश येथील रहिवासी असून, त्याने हे सोने कुठून आणले, तो हे सोन्याची बिस्किटे कुणाला देणार होता, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते. आम्ही त्याची चाैकशी करीत आहोत, असे संबंधित सूत्र सांगत होते.