शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ऑटोतून बंदी असलेल्या तंबाखुची तस्करी, पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई

By योगेश पांडे | Updated: November 5, 2023 15:46 IST

योगेश पांडे - नागपूर नागपूर : नागपूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये लाखो रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. ...

योगेश पांडे - नागपूर

नागपूर : नागपूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये लाखो रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. एका ठिकाणी तर ऑटोतून बंदी असलेल्या तंबाखुची तस्करी सुरू होती. यशोधरानगर व गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनने या दोन्ही कारवाया केल्या.

शनिवारी आठ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गणेशेपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना राजवाडा पॅलेससमोरील मार्गावर ऑटोमध्ये संशयास्पद मालाची वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. पोलिसांनी एमएच ३१ एफयू ७९३४ या क्रमांकाच्या ऑटोला थांबविले. बैजुराम रंगूराम फटिंग (४२, वैष्णोदेवीनगर, कळमना) हा चालक ऑटो चालवत होता. ऑटोतून प्रतिबंधित तंबाखू व वेगवेगळे फ्लेवर्स आढळून आले. पोलिसांनी २.०७ लाखांचा तंबाखू जप्त केला. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता रुपेश जेठानी (जरीपटका) याच्या सांगण्यावरून माल घेऊन जात असल्याचे फटिंगने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून तंबाखू व ऑटो जप्त केला. त्याला गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले व जेठानीचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्ष मुकुंद ठाकरे, देवकाते, खोरडे, चौधरी, मुकेश राऊत, प्रविण लांडे, अनुप तायवाडे, संतोष चौधरी, अमोल जासुद, विनोद गायकवाड, अनिल बोटरे व मनिष रामटेके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यशोधरानगरातील घरात तंबाखुची साठेबाजीदरम्यान शनिवारी दुपारी चार वाजता यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने हमीदनगर येथील प्लॉट क्रमांक ६०० येथून ८६ हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केला. खबऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी मोहम्मद शगीर मोहम्मद नजीर (५३) याच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरात प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये तंबाखू लपविण्यात आला होता. अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.ए.एन.खंदारे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, काळिंगे, सचिन भालेराव, श्याम कडू, अमोल भांबुरकर, मंगेश गिरी, किशोर धोटे, रामेश्वर गेडाम, रोहीत रामटेके, अक्षय कुळसंगे, नारायण कोहचडे,, नरेंद्र, किशोर धोटे व अमित ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस