शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रप्रदेशातून आलेल्या कारमधून ५० किलो गांजाची तस्करी

By योगेश पांडे | Updated: February 18, 2024 20:20 IST

नागपूर : आंध्रप्रदेशातून आलेल्या एका कारमधून ५० किलो गांजाची तस्करी करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या ...

नागपूर: आंध्रप्रदेशातून आलेल्या एका कारमधून ५० किलो गांजाची तस्करी करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली असून उत्तरप्रदेशमधील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी सकाळी वर्धा मार्गावरील चिंचभुवन परिसरात सापळा रचण्यात आला. सकाळच्या सुमारास एचआर २६ एएक्स ०१२७ या कारला अडविण्यात आले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात तीन पोत्यांमध्ये ५० किलो ओलसर गांजा आढळला. पोलिसांनी कारचालक यशपाल नानकचंद चव्हाण (३२) व अंकित श्यामवीर सिंग (२१) दोघांनाही अटक केली.

दोघेही उत्तरप्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील अकबरपूरयेथील निवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून गांजा, मोबाईल फोन व कार असा १७.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे, विजय दायव, शैलेष डोबोले, मनोज नेवारे, विवेक अढाऊ, सूरज भानावत, नितीन येरपुडे, सहदेव चिखले, रोहीत काळे, चंद्रशेखर पाटने, राहुल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :nagpurनागपूर