शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट मेट्रोत स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर

By admin | Updated: September 16, 2015 03:45 IST

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात नाविन्यपूर्ण बाबींवर भर देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.

ब्रिजेश दीक्षित : आधुनिक टेक्नॉलॉजीचे अभियंत्यापुढे आव्हाननागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात नाविन्यपूर्ण बाबींवर भर देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. बांधकामाशी संबंधित अत्याधुनिक ‘बिल्डींग इन्फर्मेशन मॉडेलिंग’ या टेक्नॉलॉजीचा उपयोग मेट्रोच्या निर्मितीत होणार आहे. तसेच मेट्रोच्या संचालनातही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. त्यामुळे हे स्मार्ट तंत्रज्ञान आत्मसात करून घेण्याचे आव्हान आजच्या अभियंत्यापुढे आहे, असे मत नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले. द इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्सच्या नागपूर शाखेतर्फे मंगळवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील द इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्सच्या सभागृहात ४८ व्या अभियंता दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ‘ज्ञानाच्या युगात अभियंत्यांपुढील आव्हाने’ विषयावर दीक्षित यांनी विचार मांडले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल घडून येत आहेत. या तंत्रज्ञानाचा शहराच्या विकासात योग्य उपयोग करून घेण्याचे आव्हान अभियंत्यांपुढे आहे. याप्रसंगी नागपूर मेट्रो रेल्वे संदर्भात बोलताना ते म्हणाले की, नाविन्यपूर्ण बाबींवर भर देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मेट्रोत केला जातो आहे. नागपूर शहरात मेट्रो रेल्वेचे एकूण ३९ किमी लांबीच्या दोन मार्गांवर एकूण ३६ थांबे राहणार आहेत. कमीत कमी खर्चात प्रकल्प साकारण्यावर भर देण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्र, पूर्व व उत्तर नागपुरातील निवासी क्षेत्र तसेच सीताबर्डीसारखे व्यापारी क्षेत्र मेट्रोने जोडणार आहे. याप्रकल्पात सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला जाईल.सिग्नलिंग व वाहतुकीची व्यवस्था स्वयंचलित राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने सुरक्षा नियंत्रित राहील. फीडर बससेवा, तिकिटांसाठी स्मार्टकार्ड आदी अद्ययावत सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जातील. अशा अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण स्मार्ट मेट्रो नागपूरकरांच्या जीवनशैलीत आमूलाग्र परिवर्तन घडविल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी हेमंत ठाकरे यांच्याहस्ते ब्रिजेश दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. संजय राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)