शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक : पुन्हा एकटे पडले मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 22:25 IST

नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीचे सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयास मंजुरीसाठी शुक्रवारी प्रस्ताव सादर केला. परंतु स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या १३ सदस्यांनी प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत आयुक्त मुंढे स्मार्ट सिटीच्या बैठकीत पुन्हा एकटे पडले.

ठळक मुद्देप्रस्ताव मंजुरीस १३ सदस्यांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीचे सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयास मंजुरीसाठी शुक्रवारी प्रस्ताव सादर केला. परंतु स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या १३ सदस्यांनी प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत आयुक्त मुंढे स्मार्ट सिटीच्या बैठकीत पुन्हा एकटे पडले.स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी मनपा मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सदस्यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या आवश्यकतेवरच प्रश्न उपस्थित केले. आजच्या बैठकीतील अजेंड्यामध्ये आयुक्त मुंढे यांनी सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयांच्या कार्यास मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.बैठकीनंतर पत्रकारांशी केलेल्या चर्चेत महापौर जोशी यांनी सांगितले की, ऐन वेळेवर बैठक बोलावण्याची आवश्यकता काय होती, हा प्रश्न चेअरमन प्रवीण परदेसी आणि केंद्र सरकारचे दीपक कोचर यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान विचारण्यात आला. यावर परदेसी यांनी नागपूरचे सिनिअर र्कौन्सिल एस.के. मिश्रा यांचे ओपिनियन घ्यायला सांगितले. मिश्रा यांनी स्पष्ट केले की, प्रकरण न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे मंडळाची बैठक घेता येत नाही. अटर्नी जनरल यांचा सल्लाही घेण्यात आला नाही. अशा परिस्थितीत घाईगडबडीने १४ फेब्रुवारी ते १० जुलै दरम्यान आयुक्तांनी सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयास मंजुरी प्रदान करता येत नाही.महापौर जोशी यांच्यानुसार एस.के. मिश्रा यांनी स्पष्ट सांगितले की, बैठक घेता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत विषयांना मंजुरी कशी काय देता येईल? प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जर काही कमीजास्त झाले तर डायरेक्टर्सला दोषी ठरविले जाईल. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय एकमताने सर्व अधिकारी व राजकीय पक्षांशी जुळलेल्या निदेशकांनी घेतला. दीपक कोचर यांचेही हेच म्हणणे होते. बैठकीत १३ सदस्य एकीकडे तर मुंढे एकीकडे होते.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीtukaram mundheतुकाराम मुंढे