शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी; मनपा व युरोपियन युनियनमध्ये करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 15:25 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे करण्यासाठी नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये बुधवारी इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला. नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या शहरी विकासातील प्राथमिकतांमधील सहकार्य क्षेत्र ओळख आणि विस्तारासाठी हा करार करण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत महापालिकेतर्फे महापौर नंदा जिचकार व आयुक्त वीरेंद्र सिंग तर कार्लस्रूच्यावतीने आययूसीचे भारतातील कार्यक्रम संचालक पियर रॉबर्टो रेमिटा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

ठळक मुद्देशाश्वत शहरी विकास : स्मार्ट सिटी मिशनचा कृती आराखडा बनविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे करण्यासाठी नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये बुधवारी इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला. नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या शहरी विकासातील प्राथमिकतांमधील सहकार्य क्षेत्र ओळख आणि विस्तारासाठी हा करार करण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत महापालिकेतर्फे महापौर नंदा जिचकार व आयुक्त वीरेंद्र सिंग तर कार्लस्रूच्यावतीने आययूसीचे भारतातील कार्यक्रम संचालक पियर रॉबर्टो रेमिटा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर आदी उपस्थित होते.नागपूर आणि कार्लस्रू हे संयुक्तपणे विशेषत: शाश्वत शहरी विकास आणि भारतातील स्मार्ट सिटी मिशनच्या गरजेसंदर्भात स्थानिक कृती योजना तयार करणार आहेत. या करारावर स्वाक्षरी करण्याआधी आययूसीचे भारताचे प्रतिनिधी आशिष वर्मा (शाश्वत विकास तज्ज्ञ) यांनी प्रकल्पाबद्दल सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सदर कार्यक्रमाचा उद्देश, अंमलबजावणीची प्रक्रिया आणि शहरांमध्ये असलेल्या समस्यांची माहिती दिली. पियर रॉबर्टो रेमिटा यांनी दिली तर रामनाथ सोनवणे यांनी नागपूर शहर, संधी आणि आव्हाने याबाबत माहिती दिली.शहरी विकास आणि नगरपालिका सेवांना एकत्रित करण्यास प्राधान्य, कार्बनचा कमी वापर आणि शहरी नवीनीकरण, शाश्वत गतिशीलता याबाबत सविस्तर माहिती दिली. शहरी विकासाच्या प्राथमिकतांना अंमलात आणण्यासाठी त्यांना सर्वोत्तम धोरण ओळखण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी आययूसी-भारत संघ आणि कार्लस्रू शहराने कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.नंदा जिचकार यांनी जागतिक हवामानातील बदल आणि शाश्वत शहरी विकासाच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाकांक्षी पद्धतीने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नागपूर शहरातील शाश्वत शहरी विकासाशी संबंधित मुद्यांबद्दल नागपूर शहर जाणून घेण्यासाठी व युरोपीय शहरांमध्ये काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या भागीदारीमुळे नागपूर आणि कार्लस्रू हे शाश्वत शहरी विकासाशी संबंधित विषयांवर एकत्रितपणे काम करतील, अशी अपेक्षा वीरेंद्र सिंग यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर