शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मेलेल्या उंदराला पाहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 21:11 IST

Nagpur News मेलेल्या उंदराला कुतूहलाने बघण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा तलावात तोल जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यात घडली.

ठळक मुद्देउमरेडच्या हिरवा तलावातील घटना

नागपूर : मेलेल्या उंदराला कुतूहलाने बघण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा तलावात तोल गेला. आवतीभोवती कुणीही नव्हते. कुणाच्याही ध्यानात ही बाब आली नाही. यातच तलावात बुडून चिमुकल्याचा हकनाक बळी गेला. शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास उमरेड येथील हिरवा तलावात ही घटना घडली.

सानिध्य दिनेश बावनकुळे असे या चारवर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी पेठ येथील निवासी दिनेश बावनकुळे हे मोलमजुरीची कामे करतात. नेहमीप्रमाणे दिनेश सकाळीच बाहेर गेले. दरम्यान सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका इसमाने घरातील मेलेला उंदीर पकडून तो हिरवा तलावाकडे नेला. त्या माणसाच्या अगदी मागोमाग सानिध्यसुद्धा गेला. त्या इसमाने उंदीर तलावाच्या काठावर फेकून दिला आणि तो घराकडे परतला. दुसरीकडे सानिध्य तलावाशेजारीच खेळत बसला. अशात तोल गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. उमरेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर करीत आहेत.

शोधाशोध व सोशल मीडियासकाळी ९ वाजतापासून गेलेला सानिध्य परत आला नाही. या कारणाने त्याच्या आईने आवतीभोवती विचारणा केली. सानिध्यची शोधाशोध सुरू झाली. एकुलता एक सानिध्य आताच घरी खेळत असताना अचानक कुठे गेला, या विचारचक्राने सारेच भंडावून गेले. सोशल मीडियावरसुद्धा त्याचे छायाचित्र आणि पोस्ट ‘फॉरवर्ड’ केली जात होती. अखेरीस तलावाच्या शेजारीच तो खेळत होता, असा सुगावा लागला. पोलिसांना सूचना देण्यात आली. तलावात शोध घेतल्यानंतर काही तासातच त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सुरक्षात्मक कुंपण करा

उमरेड नगरपालिकेने ऐतिहासिक हिरवा तलावाचे सौंदर्यीकरण केले. या ठिकाणी नागरिकांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. छोटासा बगिचासुद्धा साकारला गेला आहे. यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक आपल्या नातवंडांसोबत या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. आजी-आजोबांसोबत नातवंडे खेळत असतात. अशावेळी नागरिकांची साधारणत: गर्दी असते. निदान हिरवा तलावाच्या सभोवताल आणि काही धोकादायक ठिकाणी सुरक्षात्मक कुंपण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू