शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! पिल्लाला वाचविण्यासाठी अस्वलीणीने दिली वाघाशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 15:56 IST

या वाघाला अस्वलीणीच्या पिल्लाची शिकार करायची होती.

मुंबई: सध्या सोशल मीडियावर ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील वाघ आणि अस्वलाच्या थरारक झुंजीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. गेल्या आठवड्यात ताडोबात हा प्रकार घडला होता. येथील वनाधिकारी अक्षय कुमार यांनी हा संपूर्ण थरार आपल्या कॅमेऱ्यात टिपला.या व्हिडिओच्या सुरुवातीला एक वाघ अस्वलाच्या मागे धावताना दिसत आहे. अक्षय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या वाघाचे नाव मटकासूर आहे. येथील जामून बोडी परिसरात या वाघाचे वास्तव्य असते. याच ठिकाणी असणाऱ्या एका पाणवठ्यावर एक अस्वलीण आपल्या पिल्लाला घेऊन पाणी पिण्यासाठी आली होती. त्यावेळी वाघाने त्यांचा पाठलाग सुरू केला.

या वाघाला अस्वलीणीच्या पिल्लाची शिकार करायची होती. त्यामुळे वाघ त्यांच्यावर हल्ला करायची संधी शोधत होता. काही अंतरावर गेल्यानंतर या अस्वलीणीला पिल्लाला वाचवण्यासाठी वाघाशी लढण्यावाचून गत्यंतर नाही, हे लक्षात आले. त्यामुळे या अस्वलीणीने अचानकपणे उलटून वाघावर हल्ला केला. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले अस्वलाचे पिल्लू जोरात ओरडायला लागले. मात्र, काही केल्या वाघ या दोघांना सोडायला तयार नव्हता. मात्र, ही अस्वलीण आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता वाघाशी झुंज देत राहिली. काही काळासाठी वाघ या अस्वलीणीला ठार मारून टाकेल, असे वाटत होते. मात्र, अस्वलीणीने आपल्या पिल्लाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत हार मानली नाही. तब्बल 15 मिनिटे ही भीषण झुंज सुरू होती. यामध्ये वाघ आणि अस्वलीणीने एकमेकांना अनेक जखमाही केल्या. शेवटी अस्वलीण आणखीनच आक्रमक झाली. अखेर तिच्या आक्रमक पवित्र्यापुढे वाघाने माघार घेतली आणि त्याने तेथून पळ काढला. या सगळ्या दरम्यान अस्वलीणीच्या पिल्लाने तेथून पळ काढण्यात यश मिळवले. त्यामुळे त्याचा जीव वाचू शकला. 

टॅग्स :TigerवाघSocial Viralसोशल व्हायरलMaharashtraमहाराष्ट्र