शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आता एसटीच्या ताफ्यात स्लीपरक्लास गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 09:58 IST

एसटी महामंडळानेही स्लीपरक्लास गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दोन स्लीपरक्लास गाड्या दाखल होणार आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा नागपूर-पुणे मार्गावर धावणार

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही मोठ्या शहरात कामानिमित्त जायचे असल्यास रात्री प्रवास करायचा, सकाळीच पोहोचायचे अन् दिवसभर काम आटोपून सायंकाळी पुन्हा परतीचा प्रवास करायचा, असाच बेत सर्वजण आखतात. त्यामुळे अलीकडच्या काळात स्लीपरक्लास बसेसची मागणी वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळानेही स्लीपरक्लास गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दोन स्लीपरक्लास गाड्या दाखल होणार आहेत.एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात सध्या वातानुकूलित ४५ शिवशाही बसेस आहेत. या बसेस अमरावती, यवतमाळ, पुणे, हैदराबाद, पंढरपूर, सोलापूर, नांदेड, वरुड, गडचिरोली, शेगाव, भंडारा मार्गावर धावतात. वातानुकूलित शिवशाही बसेसचा प्रतिसाद मिळाल्यानंतर एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने स्लीपरक्लास गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी मुंबई मुख्यालयाकडे प्रस्ताव रवाना केला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात १५० स्लीपरक्लास बसेस येणार आहेत. नागपूर विभागाच्या प्रस्तावानुसार यातील दोन बसेस नागपूरला पाठविण्यात येणार आहेत. या बसेसला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आणखी बसेसचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडस्कर यांनी दिली.

भाडे माफक राहणारनागपुरातून पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळेच पुण्याला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स नेहमीच फुल्ल राहतात. पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यातही नेहमीच वेटिंगची स्थिती पाहावयास मिळते. दिवाळीच्या काळात तर खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक पुण्याचे तीन हजार रुपये तिकीट प्रवाशांकडून वसूल करतात. पुणे मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता, एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने दोन्ही स्लीपरक्लास बसेस पुणे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या या बसेसचा लाभ होणार आहे. याशिवाय दिवाळीच्या काळात प्रवाशांना पुण्याचे खासगी ट्रॅव्हल्ससारखे तीन हजार रुपये भाडे मोजण्याची गरज उरणार नाही.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ