शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

यात्रा ऑनलाईन कंपनीला ग्राहक मंचची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 20:47 IST

शारीरिक-मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागलेल्या तक्रारकर्त्या ग्राहकाला ६० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने यात्रा ऑनलाईन कंपनीला दिला. या आदेशामुळे कंपनीला जोरदार चपराक बसली.

ठळक मुद्देतक्रारकर्त्याला ६० हजार रुपये भरपाई द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शारीरिक-मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागलेल्या तक्रारकर्त्या ग्राहकाला ६० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने यात्रा ऑनलाईन कंपनीला दिला. या आदेशामुळे कंपनीला जोरदार चपराक बसली.मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा आदेश दिला. डॉ. तुषार पांडे असे तक्रारकर्त्यांचे नाव असून ते सोमलवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी ५० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली.तक्रारीतील माहितीनुसार, पांडे यांनी २६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत कुटुंबासह अदमान व निकोबार येथे जाण्याकरिता यात्रा कंपनीकडून सेवा घेतली. ते २६ डिसेंबर रोजी अंदमान येथे पोहचले असता तेथील हॉटेलमध्ये निकृष्ट दर्जाची व्यवस्था होती. तसेच, त्यांचे फेरी ते पोर्टब्लेअर व पोर्ट ब्लेअर ते हवेलॉक प्रवासाचे तिकीट पक्के करण्यात आले नाही. त्यामुळे ते पुढचा प्रवास करू शकले नाही. यासंदर्भात तक्रार केली असता कंपनीने समाधानकारक दाद दिली नाही. कंपनीच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला प्रेक्षणीय स्थळे पाहता आली नाहीत. तसेच, पोर्ट ब्लेअर व हवेलॉक येथेही आश्वासनाप्रमाणे सुविधा देण्यात आल्या नाहीत. परिणामी, ५ जानेवारी २०१७ रोजी पांडे यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून पाच लाख रुपयाची भरपाई मागितली. त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने नोटीस बजावल्यानंतर यात्रा कंपनीने स्पष्टीकरण सादर करून ही तक्रार खारीज करण्याची विनंती केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून वरील आदेश दिला. पांडे यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी कामकाज पाहिले.आनंदावर विरजण पडलेकंपनीच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ते व त्यांच्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. मोठी रक्कम खर्च करूनही त्यांना मनाप्रमाणे पर्यटनाची मजा लुटता आली नाही. उलट त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. हे सर्व कंपनीने अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे घडले असे निरीक्षण मंचच्या निर्णयात नोंदविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे