शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात स्लॅब अंगावर कोसळल्याने मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 21:23 IST

सुरक्षेच्या उपाययोजना न करता धोक्याच्या ठिकाणी मजुराला कामाला लावल्यानेच त्याचा जीव गेल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली होती.

ठळक मुद्देनिष्काळजीपणाचा आरोप : इमारत मालकावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरक्षेच्या उपाययोजना न करता धोक्याच्या ठिकाणी मजुराला कामाला लावल्यानेच त्याचा जीव गेल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली होती.कडबी चौक, बेझनबागमधील इमारतीच्या बांधकामस्थळी स्लॅब कोसळून शामराव महादेवराव हरडे (वय ४१, रा. पार्वतीनगर, रामेश्वरी) या मजुराचा करुण अंत झाला होता. तर, विनोद राऊत नामक तरुण गंभीर जखमी झाला आहे.सॅमसंगच्या शोरूमसमोर असलेली ही इमारत कनक विपीन अग्रवाल (रा. कल्पतरू कॉलनी) यांनी विकत घेतली आहे. सोमवारी तेथे हरडे, राऊत आणि अन्य मजूर दुसऱ्या माळ्यावर काम करीत होते. धोक्याचे काम सुरू असताना तेथे मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना नव्हत्या. तसेच तेथे सुरू असलेल्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर केला जात होता. त्यामुळे तेथे काही दिवसांपूर्वी घातलेल्या स्लॅबचा काही भाग मजुरांच्या अंगावर कोसळला आणि मलब्यात दबून मजूर जबर जखमी झाले. अन्य मजुरांनी धावपळ करून त्यांना बाहेर काढले. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे हरडेंचा मृत्यू झाला. तर, विनोद गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. या प्रकाराची तक्रार श्यामराव यांचा भाऊ हरीश महादेवराव हरडे यांनी जरीपटका ठाण्यात नोंदवली. हरडेच्या मृत्यूला इमारतीचे मालक कनक अग्रवाल यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे उघड झाल्याने जरीपटका पोलिसांनी अग्रवालविरुद्ध कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू