शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये बोर ते कलिंगडाच्या आकाराची संत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 14:21 IST

सुरेश भट सभागृहात आॅरेंज वर्ल्ड फेस्टिव्हल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फळांच्या प्रदर्शनात तब्बल १३६ प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात बोराच्या आकारापासून तर कलिंगडाच्या आकाराची संत्री पाहून नागपूरकर आश्चर्यचकित होत आहेत.

ठळक मुद्दे१३६ प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन

ऑनलाईन लोकमत नागपूर : जागतिक संत्रा महोत्सव असेल आणि त्यात संत्र्याचे विविध प्रकार व जाती पाहायला मिळणार नाही, हे शक्य नाही. संत्र्याचे केवळ प्रकारच नव्हे तर आकारही आगळेवेगळे आहे. सुरेश भट सभागृहात आॅरेंज वर्ल्ड फेस्टिव्हल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फळांच्या प्रदर्शनात तब्बल १३६ प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात बोराच्या आकारापासून तर कलिंगडाच्या आकाराची संत्री पाहून नागपूरकर आश्चर्यचकित होत आहेत.या प्रदर्शनात फ्लेम ग्रेप फ्रूट,, युएस-१४५ पमेलो, पमेलो-१ आणि कॅलमॅड्रिन जातीच्या फळांनी नागरिकांना आकर्षित केले. प्रदर्शनात सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट आयसीएआर नागपूरमध्ये कार्यरत रामा पाईकराव यांनी सांगितले की, फ्लेम ग्रेप फ्रूट, यूएस पमेलो, कॅलामेंड्रीन जाती आयसीएआर, सीसीआरआयमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. फ्लेम ग्रेप फ्रूट हे आतून लाल रंगाचे असते. आणि ५०० ते ६०० ग्रामपर्यंत याचे वजन असते. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे लाभदायक असते. यूएस-१४५ पमेलो बाहेरून हिरवा, परंतु आतून पंढ ऱ्या  रंगाचा असतो. याचा स्वाद सामान्य संत्र्यासारखाच असतो. वजन जवळपास ८५० ग्राम असते. पमेलो-१ कलगिंडाच्या आकाराचा संत्रा आहे. आतून याचा रंग हलका पिवळा आहे. डॉ. वायएसआर हार्टिकल्चर विद्यापीठाने तयार केले आहे. याच्याशिवाय कॅलोमेंड्रीन बोराच्या आकाराचा संत्रा आहे. तो खायला अतिशय आंबट आहे. याचे रोप घरामध्ये सजावटीच्या रूपात वापरतात.या लिंबूवर्गीय फळांच्या प्रदर्शनात आयसीएआरसह आसाम अ‍ॅग्रीकल्चर विद्यापीठ , आयसीएआर, पी.ए.व्ही लुधियाना, डॉ. व्ही.एस. आर. (तिरुपती, आंध्रप्रदेश) यांनी लागवड केलेल्या लिंबूवर्गीय फळांसह हरमनप्रीत सिंग (राजस्थान), अभिजित गुप्ता (नरखेड), श्रीकांत नेरकर (पिपळा के.), एस. ब्रह्म रेड्डी (कडपा, आंध्रप्रदेश), नत्थू काळे (सुसुंद्री, ता. कळमेश्वर), सुरेश जगताप (तोंडाखैरी), मनोज चांडक, विलास गुल्हाणे, दिलीप तिजारे (खापरी के. नरखेड), नितीन राऊत (नरखेड), यू. कालेरंगा (लंगदार, मिझोरम), बनिया लाल (कामठी), रुपेश क्षीरसागर (पांढुर्णा, मध्य प्रदेश), दीपक कुहाडे (सौंसर, मध्य प्रदेश), प्रभात पाटील (अचलपूर, जि. अमरावती), अनिल टेंभे, शिवशंकर काळे (सुसुंद्री), वर्षा सरोदे (कोहळी, ता. कळमेश्वर), राजेंद्र रेवतकर (मोहपा), योगेश्वर सातपुते (नागपूर), या शेतक ऱ्यांचीही फळे प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहेत.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरFarmerशेतकरी