शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीच्या साह्याने सापडला नागपूर रेल्वेस्थानकावर चुकलेला सहा वर्षांचा बालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 11:24 IST

गर्दीत आपल्या नातेवाईकांपासून चुकामूक झालेल्या एका सहा वर्षांच्या बालकाला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने शोधल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता घडली.

ठळक मुद्देनातेवाईकांपासून झाली चुकामूक

आॅनलाईन लोकमतनागपूर : रेल्वेस्थानक वा जत्रेच्या गर्दीत लहान मुले हरवल्याच्या घटना आपल्या चित्रपटांच्या कथांना वर्षानुवर्षे विषय पुरवित आल्या आहेत. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या घटनांवर मात करता येते आहे. अशीच एक घटना नागपूर रेल्वे स्टेशनवर घडली. गर्दीत आपल्या नातेवाईकांपासून चुकामूक झालेल्या एका सहा वर्षांच्या बालकाला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने शोधल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता घडली.सोमवारी सकाळी ११.३० वाजता इसत्याक अहमद खान रा. शिलेवाडा, हवामहल नागपूर हे आपल्या सहा वर्षांचा नातू दस्तेकाम याला घेऊन त्याच्या आजोबाच्या भेटीसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आले होते. आजोबांशी भेटून परत जात असताना गर्दीत त्यांच्या नातवासोबत त्यांची चुकामूक झाली. नातू हरविल्याचे लक्षात येताच त्यांनी रेल्वे सुरक्षा दल गाठून उपनिरीक्षक होतिलाल मीणा यांना घडलेली घटना सांगितली. मीणा यांनी लगेच आरपीएफ जवानांसोबत सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यांना हा बालक प्लॅटफार्म क्रमांक १ च्या इटारसी एन्डकडील भागात असलेला ओव्हरब्रीज उतरून एमसीओ गेटकडे जाताना दिसला. लगेच मीणा यांनी आरपीएफ जवानांसह एमसीओ गेटकडे धाव घेतली. यावेळी हा बालक पार्किंग परिसरात रडत उभा असलेला दिसला.त्याला निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. तेथे कागदोपत्री कारवाईनंतर या बालकाला त्याच्या आजोबांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस