शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूर परिसरातील खासदाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा : डॉ. नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 05:54 IST

सभागृहाच्या कामकाजाला पुन्हा प्रारंभ होताच विरोधकांनी पुन्हा पीडित महिलेची व्यथा सभागृहात मांडली

नागपूर : मुंबईतील चेंबूर परिसरातील खासदारांच्या विरोधात साकीनाका पोलिसात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाल्याचा मुद्दा गुरुवारी विधान परिषदेत गाजला. याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित आरोपी खासदाराच्या विरोधात विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याचे निर्देश दिले.

ठाकरे गटाचे अनिल परब यांनी मुंबईतील एका खासदाराच्या विरोधात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी साकीनाका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. या खासदाराने दुबई येथील एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केला. या संदर्भात एसआयटी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. 

डॉ. मनीषा कायंदे यांनी सांगितले की,  या खासदाराच्या विरोधात एका महिलेने बलात्कार, लैंगिक शोषण आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. पीडित महिलेने यासंदर्भातील ट्विट्स पोस्ट केले आहेत. पोलिस तिची तक्रार  नोंदवून घेत नाहीत. त्यामुळे आता धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रमाणे न्याय मिळवून द्यावा, असे म्हणत या पीडितेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यानंतर विरोधकांनी यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशीची मागणी लावून धरली. यावेळी सत्ताधारी सदस्यांनी गोंधळाला सुरुवात केली.  दोन्ही बाजूंनी गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे उपसभापतींनी दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

सभागृहाच्या कामकाजाला पुन्हा प्रारंभ होताच विरोधकांनी पुन्हा पीडित महिलेची व्यथा सभागृहात मांडली. अनिल परब म्हणाले, पीडितेने मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनादेखील पत्र पाठवल्याचा उल्लेख केला आहे. तिला धमक्या मिळत आहेत. एसआयटी स्थापन करून संबंधित खासदारांची उच्चस्तरीय चौकशी करावी.

योग्य तो निर्णय घेतला जाईल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीचे निर्देश दिलेत. या महिलेला न्याय देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी सूचनादेखील गोऱ्हे यांनी केली.  उपसभापतींच्या निर्देशावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश तपासून पाहिले जाईल. अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले, यावर अधिवेशन संपण्यापूर्वी घोषणा करावी, असे निर्देश उपसभापतींनी दिले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेMaharashtraमहाराष्ट्र