लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक दिवसापासून आजारी असलेल्या रामनगरातील महिलेचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला कोरोनाची लक्षणे असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंबाझरी पोलिसांनी याप्रकरणी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आता वैद्यकीय अहवालाकडे सर्वांची नजर लागली आहे.मृत महिला ३९ वर्षाची होती. ती रामनगर परिसरात राहत होती. ती हृदय रुग्ण होती. तिच्या किडनीवरही परिणाम झाला होता. त्यामुळे तिचे डायलिसिस सुरू होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तिची प्रकृती खालावल्याने तिला स्रेहनगरातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला कोरोनाची लक्षणे असल्याचे सांगून प्रकरण अंबाझरी पोलिसांकडे सोपविले. त्यानंतर मेडिकलमधून वैद्यकीय पथक बोलवून या महिलेचा मृतदेह मेडिकलमध्ये पाठविण्यात आला. या घडामोडींमुळे महिलेचे नातेवाईक आणि परिसरातही खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमका प्रकार स्पष्ट होणार आहे, त्याकडे आमचे लक्ष लागून असल्याची माहिती अंबाझरीचे ठाणेदार विजय करे यांनी दिली.
नागपूरच्या रामनगरातील आजारी महिलेचा मृत्यू:कोरोनाचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 21:56 IST
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक दिवसापासून आजारी असलेल्या रामनगरातील महिलेचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला कोरोनाची लक्षणे असल्याचा ...
नागपूरच्या रामनगरातील आजारी महिलेचा मृत्यू:कोरोनाचा संशय
ठळक मुद्देअंबाझरी पोलिसांकडे झाली नोंद