शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

आजारी पतीला पत्नीनेच लुटले, बँक खात्यातून चुपचाप ६.७३ लाख पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 16:54 IST

खांद्याचे ऑपरेशन झाल्याने गाेंडाणे रुग्णालयात भरती हाेते. या काळात त्यांची बँकेची सर्व कागदपत्रे घरी हाेती. याच वेळेचा फायदा उचलत पत्नीने त्यांच्या बँक खात्यातून ६.७३ लाख रुपयांची उचल केली.

ठळक मुद्देरक्कम तिघांच्या बँक खात्यात जमा

नागपूर : सेवानिवृत्त पती आजारी असल्याचा फायदा घेत पत्नीने अन्य दाेघांच्या मदतीने त्यांच्या बँक खात्यातील ६ लाख ७३ हजार ८८ रुपयांची उचल करीत ती संपूर्ण रक्कम तिघांच्या बँक खात्यात जमा करीत पतीची फसवणूक केली. या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, यात दाेन महिलांचा समावेश आहे. ही घटना बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरखेडी येथे नुकतीच उघडकीस आली.

आराेपींमध्ये सिद्धार्थ रामराव गाेंडाणे यांच्या पत्नीसह अन्य एक महिला व टाेनी थॅमस जाेसेफ या तिघांचा समावेश आहे. सिद्धार्थ गाेंडाणे (६२, रा. बाेरखेडी, ता. नागपूर ग्रामीण) हे दाेन वर्षांपूर्वी रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर ते पत्नीसाेबत बाेरखेडी येथे राहू लागले. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांच्या बँक खात्यात एकूण २२ लाख रुपये हाेते. यातील १५ लाख रुपयांची त्यांनी एफडी (फिक्स डिपाॅझिट) केल्याने त्यांच्या खात्यात सात लाख रुपये शिल्लक राहिले हाेते.

दरम्यान, एप्रिल २०२१ मध्ये त्यांच्या खांद्याचे ऑपरेशन झाले. त्यामुळे ते सप्टेंबर २०२१ मध्ये रुग्णालयात भरती हाेते. या काळात त्यांची बँकेची सर्व कागदपत्रे घरी हाेती. काही दिवसांपूर्वी त्यांनी बँकेत जाऊन विचारपूस केली असता, त्यांच्या खात्यात केवळ २६ हजार ९१२ रुपये शिल्लक असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

या प्रकाराची त्यांनी चाैकशी केली असता, त्यांची पत्नी, एक अन्य महिला आणि टाेनी थाॅमस जाेसेफ या तिघांनी संगनमत करून त्यांच्या खात्यातून बँक खात्यातून ६ लाख ७३ हजार ८८ रुपयांची उचल करीत रक्कम आपापल्या खात्यात जमा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात धाव घेतली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पाेलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही किंवा चाैकशीसाठी ताब्यात घेतले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारfraudधोकेबाजी