शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

श्याम पेठकर यांना सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:35 IST

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या केंद्रीय शाखेतर्फे दरवर्षी रंगकर्मींना गो. ब. देवल स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यलेखक म्हणून यंदा चित्रपट व नाट्यलेखक श्याम पेठकर यांना त्यांच्या ‘तेरव’ या नाटकासाठी प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या केंद्रीय शाखेतर्फे दरवर्षी रंगकर्मींना गो. ब. देवल स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यलेखक म्हणून यंदा चित्रपट व नाट्यलेखक श्याम पेठकर यांना त्यांच्या ‘तेरव’ या नाटकासाठी प्रदान करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे १४ जून रोजी मुंबईच्या यशवंतराव नाट्य मंदिरात आयोजित भव्य सोहळ्यात पेठकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर नाडकर्णी व अभिनेत्री दया डोंगरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा सोहळा मुंबई येथे यशवंतराव नाट्य मंदिरात सायंकाळी पार पडला. या सोहळ्यात कमलाकर नाडकर्णी आणि अभिनेत्री दया डोंगरे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्याम पेठकर यांना लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या ‘ऋतुस्पर्श’ या ललितलेख संग्रहास २००७ चा भैरू रतन दमाणी पुरस्कार मिळालेला आहे. गोष्ट छोटी डोंगराएवढी या मराठी चित्रपटाच्या संवाद लेखनासाठीही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. तेरव हा दीर्घांक असून आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांचा जीवनसंघर्ष त्यांनी या नाटकातून मांडला आहे. त्यांनी हरीश इथापे यांच्यासह स्थापन केलेल्या अ‍ॅग्रो थिएटरमार्फत हे नाटक रंगमंचावर आणण्यात आले. या नाटकाची महाराष्ट्रभर चर्चा झालेली आहे.

टॅग्स :Natakनाटकnagpurनागपूर