शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळ : ३४ कोटींच्या नव्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:30 IST

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तीर्थस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ३४ कोटींच्या नवीन प्रस्तावित कामांना बुधवारी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या संदर्भातील बैठक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मुंबईत झाली.

ठळक मुद्देशिखर समिती : मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तीर्थस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ३४ कोटींच्या नवीन प्रस्तावित कामांना बुधवारी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या संदर्भातील बैठक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मुंबईत झाली.बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान सचिव ऊर्जा अरविंद सिंह, मुख्य सचिव डी.के.जैन, एमएमआरडीए चे वरिष्ठ अधिकारी, महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ३४ कोटी ९२ लाख रुपयांच्या प्रस्तावित नवीन कामांना शिखर समितीने मंजुरी दिली. नवीन कामांमध्ये महाद्वार बांधकाम, राममंदिर सभागृह बांधकाम, हनुमान मंदिर सभागृह बांधकाम, उपाहार गृह बांधकाम, मुला-मुलींकरिता इनडोअर गेम स्थळाचे बांधकाम, नागपूर सावनेर रस्त्यापासून कोराडी महालक्ष्मी मंदिर पोचमार्ग बांधकाम, आकस्मिक खर्च, प्रकल्प सल्लागार शुल्क, देखरेख शुल्क, गुणवत्ता तपासणी शुल्क या कामांचा समावेश आहे.श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या तीर्थस्थळ विकास प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मंजुरी १८५ कोटींची असून सुधारित प्रशासकीय मंजुरी १३४.३८ कोटींची आहे. दुसरी प्रशासकीय मंजुरी २४.७५ कोटींची मिळाली असून एकूण १८९.१३ कोटी मध्ये शासनाचा वाटा १५१.३४ कोटींचा तर नासुप्रचा वाटा ३७.८० कोटींचा आहे.या प्रकल्पात समाविष्ट एकूण १२ कामे आहेत. त्यात आवार भिंत, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बस स्टॉप, वाहनतळ, टुरिस्ट रिसेप्शन सेंटर, पुजारी निवास, भक्त निवास, विद्युतीकरण, पाणीपुरवठ्याची कामे, कुकिंग शेड, अंतर्गत रस्ते, विस्तारीत आवार भिंत (नवीन) व सभागृह या कामांचा समावेश आहे. आतापर्यंत ६८ कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी ६७.६९ कोटी खर्च झालेले आहेत. आवार भिंतीचे काम सुरू आहे. व्यापारी संकुलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. भक्त निवासाचे अंतर्गत सजावटीचे काम सुरू आहे. ज्योतीभवन इमारतीचे पहिल्या मजलाचे काम आरसीसी पूर्ण झाले. वाहनतळाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. बस स्थानकाच्या तीन इमारतीच्या आरसीसीचे काम पूर्ण झाले आहे. पर्यटक म्युझियम इमारत व थ्रीडी, फोर डी व सेव्हन डी थिएटरचे काम सुरू आहे. कुकिंग शेड इमारतीचे लोखंडी छताचे काम प्रगतिपथावर आहे, मुख्य मंदिर सभागृहाचे काम सुरू आहे.

टॅग्स :Templeमंदिरnagpurनागपूर