शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार : प्रेयसीची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:31 IST

लग्नाच्या आणाभाका घेत दोन वर्षांपासून एकमेकांसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या उच्चशिक्षित प्रेमीयुगुलांच्या संबंधात वितुष्ट आले. प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेत प्रियकरावर बलात्काराचा आरोप लावला. तिच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी प्रतीक भारतभूषण मल्होत्रा (वय २८) नामक तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देप्रेमीयुगुलांच्या संबंधात वितुष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाच्या आणाभाका घेत दोन वर्षांपासून एकमेकांसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या उच्चशिक्षित प्रेमीयुगुलांच्या संबंधात वितुष्ट आले. प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेत प्रियकरावर बलात्काराचा आरोप लावला. तिच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी प्रतीक भारतभूषण मल्होत्रा (वय २८) नामक तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पावनभूमी परिसरात राहणारा प्रतीक इंटेरिअर डिझाईनिंग करतो. टेक्स्टाईल इंजिनिअर असलेल्या २७ वर्षीय तरुणीसोबत दोन वर्षांपूर्वी प्रतीकची फेसबुकवरून ओळख झाली. फेसबुक फ्रेन्ड बनलेल्या या दोघांनी नंतर एकमेकांना आपले मोबाईल नंबर एक्स्चेंज केले. त्यानंतर ते तासन्तास संपर्कात राहायचे. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दरम्यान, १७ ऑक्टोबर २०१७ ला रात्री त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर ते नेहमीच शरीरसंबंध जोडू लागले. प्रेयसीच्या तक्रारीनुसार, प्रतीकने त्यांच्या शरीरसंबंधाचे तसेच प्रेयसीचे अश्लील फोटो काढून ठेवले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध जोडत होता. २८ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्यात हे सुरू होते. तिने लग्नाचा विषय काढताच तो प्रारंभी तिला टाळत होता. काही दिवसांपूर्वी तिने लग्नाचा विषय काढला असता त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. तो दुसरीकडे सूत जुळवून लग्न करण्याच्या तयारीत असल्याचा संशय आल्याने प्रेयसीने प्रतीकविरुद्ध सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार