शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोटा दुप्पट करण्याची कला दाखवून होतात क्षणात ‘छूमंतर’; नागपूरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 10:19 IST

अनेक व्यावसायिकांना गंडा : अटकेपूर्वी उभी होते वकिलांची फौज

- नरेश डोंगरेनागपूर : नोटा दुप्पट करण्याची कला अवगत असल्याचा दावा करून अनेकांना कंगाल करणाऱ्या ‘छूमंतर’ टोळीने पोलिसांनाही चक्रावून टाकले आहे. या टोळीतील दोन सदस्यांना पारडी पोलिसांनी अटक केली. मात्र, या भामट्यांनी हडपलेली रक्कम परत मिळविण्यात यश आले नाही. उलट टोळीच्या पाठीराख्यांनी वकिलांची फौज उभी करून आपल्या नेटवर्कचा पोलिसांना परिचय दिला.

टोळीचे मुख्यालय पश्चिम बंगालमध्ये २४ परगणा जिल्ह्यात आहे. व्यवसायात  जम असलेल्यांसोबत या टोळीचे सदस्य व्यावसायिक संबंध निर्माण करतात. एक-दोन व्यवहार झाल्यानंतर रक्कम दुप्पट करून देण्याचे जाळे टाकतात. पाचशेच्या दोन-चार नोटा हातचलाखीने दुप्पट करूनही दाखवतात. त्यामुळे विश्वास बसल्याने अनेक जण स्वतःसोबतच ओळखीच्या व्यक्तींचे लाखो रुपये दुप्पट करून देण्यासाठी या भामट्यांना घरी बोलावत. त्यांच्याकडच्या लाखोच्या नोटा ताब्यात घेत भामटे लक्ष विचलित करतात व रोकड पिशवीत टाकतात आणि गरम पाण्यात नोटांसारखे दिसणारे कागदाचे बंडल टाकून त्यावर विशिष्ट रसायन घालतात. पाण्याचा रंग बदलल्यानंतर तीन ते चार तासांनंतर रक्कम काढून घ्या, अशी थाप मारून पसार होतात.

जेथे भामटे, तेथे वकील

देशातील विविध प्रांतात अशा प्रकारे अनेकांना लाखोंचा गंडा घातल्यानंतर हे भामटे त्यांच्या घरी काही दिवसांसाठी मुक्कामाला जातात. चुकून कुण्या शहरातील पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. तर त्यांना तिथल्या तिथे सोडवून घेण्यासाठी त्यांची वकील मंडळी सज्ज असते.  कोर्टात जामीन मिळाला नाही तर पोलीस आणि आरोपींच्या पाठोपाठ ही वकील मंडळी संबंधित शहरात पोहोचते. 

प्रवासासाठी हजारो खर्च 

लाखोंची रक्कम हाती लागल्यामुळे झटपट पळून जाण्यासाठी ते कधी विमानाचा तर कधी खासगी वाहनाचा वापर करतात. नागपुरातून शाहू आणि डायरे नामक व्यापाऱ्यांकडून चार लाख लुटल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्यासाठी या टोळीने नागपूर ते बिलासपूरसाठी २० हजारांची आणि नंतर कोलकाता येथे पळून जाण्यासाठी २० हजारांची आलिशान टॅक्सी केल्याचे उघड झाले आहे.

‘पीसीआर’मध्ये टाईमपास 

पीसीआर मिळाला तरी या टोळीचे सदस्य दर दिवशी छातीत दुखणे, हार्टबीट वाढल्याची तक्रार करून वैद्यकीय सुविधेच्या नावाखाली टाईमपास करतात आणि पोलिसांचा मार चुकवितात. पोलिसांनी पकडलेल्या आरोपी सुमित घोष आणि इदरीस खान या दोघांनी सात दिवसांच्या पीसीआरमध्ये असाच टाईमपास केला अन् न्यायालयीन कोठडीत पोहोचले.

टॅग्स :nagpurनागपूरfraudधोकेबाजी