शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

३० शिक्षकांना कारणे दाखवा  :  शाळांची गुणवत्ता घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 21:39 IST

नागपूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळेच्या शिक्षकांना शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे.

ठळक मुद्देभरारी पथकांच्या माध्यमातून शाळांचे सर्वेक्षण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची घसरलेली पटसंख्या, सोबतच होत असलेली गुणवत्तेची घसरण थांबविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी अध्ययन निष्पत्ती कार्यक्रम जिल्हाभर राबविला. काही शाळांना त्याचा फायदा झाला तर काही शाळांमध्ये कुठलीही प्रगती दिसून आली नाही, असे शिक्षण विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. अशा ३० शाळेच्या शिक्षकांना शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे.शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी अध्ययन निष्पत्ती कार्यक्रम राबविला. एकदा कार्यक्रम राबविल्यानंतर त्यावर विशेषत्वाने भर देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत विशेष परिणाम झाला नाही. भाषा आणि गणित या विषयात अजूनही विद्यार्थी कमजोरच आहेत. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली की नाही, याची पाहणी करण्यासाठी जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी शाळांना भेटी देणे सुरू केले. यासाठी उपशिक्षणाधिकारी ढवंगळे व आगरकर यांच्या नेतृत्वात दोन भरारी पथके नेमण्यात आली. प्रत्येक पथकात सहा सदस्य आहे. यात विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचाही समावेश आहे. पथकाद्वारे उलट तपासणी सुरू आहे. पथक विशेषत: दुर्गम भागातील शाळा व कमी पटसंख्येच्या शाळांना भेटी देत आहेत. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयात गुणवत्ता कमी आढळली, त्या शाळेच्या शिक्षकांचा पथकाकडून अहवाल तयार करण्यात येत आहे. या अहवालाचे शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी हे अवलोकन करुन अशा गुणवत्ता कमी असलेल्या वर्गाच्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावत आहेत. आजवर भरारी पथकाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावर अवलोकन झाल्यावर वंजारी यांनी ३० वर शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. त्यामुळे सध्या गुणवत्ता कमी असलेल्या वर्गातील शिक्षकांमध्ये या भरारी पथकाची चांगलीच धास्ती वाढली आहे. विशेष म्हणजे सात दिवसापर्यंत उत्तर न सादर केल्यास, शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा