शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

त्या दुर्दैवी मृतकांना 'शरदवासी ‘ म्हणायचे का? भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2023 07:00 IST

Nagpur News शरद पवारांनी राजकारणाची खालची पातळी गाठली असून त्यांच्या कार्यकाळात मृत झालेल्यांना 'शरदवासी' असे म्हणायचे का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी शनिवारी रात्री ट्वीट केले.

योगेश पांडे नागपूर : समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातावरून राज्यात राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'देवेंद्रवासी' या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शरद पवारांनी राजकारणाची खालची पातळी गाठली असून त्यांच्या कार्यकाळात मृत झालेल्यांना 'शरदवासी' असे म्हणायचे का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी शनिवारी रात्री ट्वीट केले.

समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. हा अपघात आहे. समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जीवाचे रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो. मात्र फडणवीस यांचा व्यक्तिगत विरोध करताना पवार यांनी खालची पातळी गाठली. पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेल्या प्राणघातक घटना ते सोयीस्कर विसरले. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, गोवारींची चेंगराचेंगरी , मावळचा गोळीबार या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात झाल्या होत्या.या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले व अजूनही जखमा ओल्या आहेत. मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच "शरदवासी" म्हणायचे का असा सवाल बावनकुळे यांनी केला.

टॅग्स :Accidentअपघात