शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणामुळे दुकानदाराने तलावात घेतली उडी, बिट मार्शल्स ठरले देवदूत

By योगेश पांडे | Updated: May 7, 2024 16:53 IST

Nagpur : नागपूर पोलिसांच्या दोन बिट मार्शल्सने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारत वाचविला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जबाजारीपणामुळे एका मेडिकल दुकानदाराने चक्क जीव संपविण्याचा अविचार करत अंबाझरी तलावात उडी मारली. ते गटांगळ्या खात असताना नागपूर पोलिसांच्या दोन बिट मार्शल्सने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारत स्थानिकांच्या मदतीने त्याचा जीव वाचविला. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाला वाऱ्यावर सोडत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकानदारासाठी बिट मार्शल्स देवदूतच ठरले.

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अविनाश नावाच्या एका औषधी दुकानदारावर कर्ज झाले होते. कर्जाला कंटाळून त्याने जीव देण्याचा विचार केला. तो अंबाझरी तलावाजवळ गेला व पाण्यात उडी घेतली. स्थानिक लोकांनी हे पाहून आरडाओरड केली व पोलिसांना माहिती दिली. बिट मार्शल प्रशांत गायधने व यशवंत धावडे हे तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने तलावात उडी मारून अविनाशला बाहेर काढले व तातडीने प्रथमोपचार दिले. चौकशीदरम्यान अविनाशचे मानेवाड्याजवळ औषधांचे दुकान असल्याची बाब समोर आली. दोघांनीही अविनाशला हिंमत दिली व अंबाझरी पोलीस ठाण्यात नेले. ठाणेदार विनायक गोल्हे यांनीदेखील अविनाशचे समुपदेशन केले व कुटुंबियांना माहिती देत बोलावून घेतले. अविनाश यांचा कुटुंबियांना पाहताच बांध फुटला व असा अविचार करणार नाही अशी भावना व्यक्त केली. गायधने व धावडे यांचा धाडसी कामगिरीसाठी पोलीस ठाण्यात सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर