शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

‘अवनी’ला गोळी मारणे बेकायदाच; व्याघ्र प्राधिकरण समितीचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 05:22 IST

टी-१ (अवनी) वाघिणीला बेशुद्ध करून तिला जेरबंद करणे आवश्यक असताना तिला गोळी घालून ठार करणे बेकायदा होते, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने राज्याचा वन विभाग आणि शिकारी असगर अली खान याच्यावर ठेवला आहे.

नागपूर/मुंबई : टी-१ (अवनी) वाघिणीला बेशुद्ध करून तिला जेरबंद करणे आवश्यक असताना तिला गोळी घालून ठार करणे बेकायदा होते, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने राज्याचा वन विभाग आणि शिकारी असगर अली खान याच्यावर ठेवला आहे.यवतमाळातल्या राळेगाव जंगलातील नरभक्षक टी-१ वाघिणीला २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री शूटर असगर अली खान यानेगोळ्या घालून ठार केले होते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी वन्यप्राणीप्रेमींनी केली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दोन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच सादरकेला आहे.अवनीच्या संदर्भात वन विभागाने चांगली पूर्वतयारी केली होती; मात्र २ नोव्हेंबर रोजी तिला आणि तिच्या शावकांना पकडण्यासाठी योग्य नियोजन केले गेले नाही. शिवाय, स्वसंरक्षणार्थ अवनीला गोळी घालावी लागली, असा दावा शार्पशूटर असगर अली खान याने केला होता.मात्र, अवनी पाठमोरी असताना तिला गोळी घालण्यात आल्याचे शवविच्छेदनातून दिसून येते, असे समितीने म्हटले आहे.अवनीला गोळ्या घालणारा शिकारी असगर अली खान याने भारतीय शस्त्रास्त्र कायदा १९५८ च्या ३(१), इंडियन व्हेटरनरी कौन्सिल अ‍ॅक्ट १९८४, वन्यजीव रक्षक कायदा १९७२ आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या स्टॅण्डर्ड आॅपरेटिव्ह प्रोसिजर(एसओपी)चा भंग झाल्याचे एनटीसीच्या अहवालात म्हटलेआहे. शिवाय, अवनीला बेशुद्ध करताना वापरलेल्या डार्टमधील औषध ५६ तास जुने असल्याचा खुलासाही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला न्यायालयात नेण्याची तयारी वन्यप्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे.>पशुवैद्यकीय परिषदही करणार कारवाईआता या अहवालात वन विभागाने वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी जे डार्ट मारले ते कुठल्याही पशुवैद्यकीय तज्ज्ञ नसताना मारले. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदही या प्रकरणात कारवाई करणार असल्याचे सांगितले जाते.>अहवाल नाहीराष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने नेमलेल्या समितीने हा अहवाल राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन अणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांना सादर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असा कुठलाही अहवाल राज्य सरकारला अद्याप प्राप्त झालेला नाही, असे वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>नरभक्षक टी-१ वाघिणीला २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री शूटर असगर अली खान याने गोळ्या घालून ठार केले होते.

 

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीण