शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ; नागपुरात अंत्यसंस्कारासाठी घेतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:55 IST

Corona death cases, money for funeral कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा मृतांवर मनपाचे कर्मचारी अंतिम संस्कार करतात. घाटावर गर्दी वाढल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर लवकर अंत्यसंस्कार करण्यासाठी हजार ते दीड हजार रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देकोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर लवकर अंत्यसंस्कारासाठी पैशाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा मृतांवर मनपाचे कर्मचारी अंतिम संस्कार करतात. घाटावर गर्दी वाढल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर लवकर अंत्यसंस्कार करण्यासाठी हजार ते दीड हजार रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानेवाडा घाटावर हा प्रकार सुरू आहे. मृताचे नातेवाईक कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संकटात असताना हा धक्कादायक प्रकार सुरू आहे. अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

महापालिकेच्या सर्व घाटांवर अंत्यसंस्कारासाठी मोक्षकाष्ठ मोफत उपलब्ध केले आहेत. जेथे मोक्षकाष्ठ नाहीत अशा घाटावर गोवऱ्या व लाकूड मोफत दिले जाते. पाच घाटांवर शवदाहिनीची सुविधा आहे. दुसरीकडे काही कर्मचारी पैशाची मागणी करीत असल्याने यंत्रणेची प्रतिमा मलिन होत आहे. मात्र मागील काही दिवसात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा मृतदेहांवर मनपाचेच कर्मचारी अंतिम संस्कार करतात. काही घाटावर वेटिंग असल्याने लवकर अंतिम संस्कारासाठी पैसे घेत असल्याचा प्रकार सुरू आहे.

कोरोना विषाणूने शहरात अक्षरश: थैमान घातले असून मृत्यूचा आकडा ८० च्या पुढे गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. असे असताना मानेवाडा घाटावर कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड हजार रुपये घेतल्याची माहिती मृताच्या नातेवाईकानी दिली. घाटावरील कंत्राटदाराच्या लोकांकडून ही वसुली सुरू असल्याची माहिती आहे. यामुळे यंत्रणा बदनाम होत आहे.

दोषींवर काय कारवाई करणार?

महापालिकेकडून मृतदेहासाठी गोवऱ्या आणि लाकडे मोफत पुरविली जातात. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. कोणी पैसे मागितले तर व या संदर्भात तक्रार असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मानेवाडा घाटावरील प्रकारासंदर्भात मनपा प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याची नागरिकांना उत्सुकता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू