शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

खळबळजनक! नागपुरात घरमालकिणीवर भाडेकरू दांपत्याचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 10:39 IST

किरायेदार दाम्पत्याने नऊ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांकडे नोंदवली आहे. विशेष म्हणजे, पतीपेक्षा पत्नीनेच समलैंगिक संबंध जोडून जास्त शारीरिक शोषण केल्याचे संबंधित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

ठळक मुद्देदोघेही अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : किरायेदार दाम्पत्याने नऊ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांकडे नोंदवली आहे. विशेष म्हणजे, पतीपेक्षा पत्नीनेच समलैंगिक संबंध जोडून जास्त शारीरिक शोषण केल्याचे संबंधित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या खळबळजनक प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला अटक करून त्यांची कोठडीत रवानगी केली आहे.बलात्कार आणि समलैंगिक संबंधाचा आरोप करणारी महिला प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. आरोपी रामकिशन शोपाल जांगिड आणि त्याची पत्नी दोन मुलांसह २०११ मध्ये तिच्याकडे किरायेदार म्हणून राहायला आले. त्यावेळी तक्रारदार महिला एका वकिलाकडे अटर्नी म्हणून काम करत होती. त्यांच्याशी वाद झाल्यानंतर आरोपी जांगिडने तिला मदत केली. घरमालक आणि किरायेदार म्हणून त्यांच्यात चांगले संबंध होते. त्यामुळे चहा पिण्याच्या बहाण्याने पती-पत्नी तिला नेहमीच घरी बोलवायचे.

एक दिवस आरोपी महिलेने तिला आपल्याजवळ खेचून तिच्याशी नको ते वर्तन केले. त्यानंतर जांगिडनेही तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर हे जांगिड दाम्पत्य मनात येईल तेव्हा तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करायचे. महिला नेहमीच आक्रमक राहायची. ती समलैंगिक संबंध बनवून अनैसर्गिक कृत्य करायची.पती-पत्नीने त्यांच्या घृणास्पद कृत्याचे फोटो काढले आणि अश्लील चित्रफीतही तयार केली. नंतर पीडितेने संबंधास नकार दिल्यास महिला आपल्या पतीसोबत तिचे लग्न लावून देण्याची तयारी दाखवून किंवा अश्लील फोटो दाखवून तिचे लैंगिक शोषण करत राहिली. दोन वर्षांपर्यंत हा घृणीत प्रकार चालला. त्यानंतर २०१३ ला जांगिड दाम्पत्य प्रियदर्शिनी नगरात राहायला गेले. त्यानंतरही जांगिड कधी तिला आपल्या घरी बोलवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करायचा किंवा तिच्या घरी जाऊन करायचा. तर त्याची पत्नी तिला वारंवार आपल्या घरी नेऊन अत्यंत घृणीत कृत्य करायची.

२०१५ मध्ये त्यांनी तिला जगन्नाथ पुरी येथे नेले. त्यानंतर त्यांनी कुकृत्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यामुळे पीडित महिलेला त्रास होऊ लागला. २०१६ मध्ये ती डॉक्टरकडे गेली असता तिची गर्भपिशवी खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ती काढण्यासाठी आरोपींनी सर्व खर्च केला. त्यानंतर १०० आणि ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर समलैंगिक विवाहाचे संमतीपत्र बनविण्यात आले. नंतर त्यांचे कुकृत्य रोजचेच झाले. ती टाळाटाळ करीत असल्याचे पाहून जांगिडच्या पत्नीचा २४ जून २०२० ला तिला फोन आला. तुझे सगळे कपडे घेऊन तू माझ्या घरी राहायला ये, असे तिने म्हटले. त्यानुसार, ती आरोपीच्या दाते ले-आऊटमधील घरी राहायला गेली. मात्र, सहा दिवसातच पती-पत्नीचे वर्तन बिघडले. आरोपी जांगिडने तिला पत्नीचा दर्जा देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी आरोपी जांगिडने लग्न करण्यास नकार दिला आणि पती-पत्नीने तिला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन घराबाहेर हाकलून दिले. त्यामुळे ती पोलिसांकडे पोहचली. लग्नाचे आमिष दाखवून तब्बल नऊ वर्षे पती-पत्नी दोघांनीही अत्याचार करून, समलैंगिक संबंध प्रस्थापित करून आपले जीवन उद्ध्वस्त केल्याची तक्रार तरुणीने प्रतापनगर ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी जांगिड दाम्पत्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

अखेर गुन्हा दाखलप्रतापनगरचे ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी आरोपी जांगिड दाम्पत्याला ठाण्यात बोलवून आरोपाची शहानिशा केली असता त्याने तुम्हाला जे करायचे ते करा. मी कोर्टात पाहून घेईन, अशी अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे पोलिसांनी सर्व बाजू तपासल्यानंतर आरोपींना रविवारी अटक केली. त्यांची पोलीस कोठडी मिळवली.  २१ जुलैला आरोपी दाम्पत्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

वकिलाचेही केले होते अपहरणतक्रारदार महिलेसोबत मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या एका वकिलाचे जांगिडने दोन वर्षांपूर्वी अपहरण केले होते, अशीही धक्कादायक माहिती उघड झाली असून याप्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल आहे, अशी माहिती ठाणेदार खंदाळे यांनी दिली आहे.

अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणारतक्रारदार महिलेच्या संबंधाची तिचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी अशा सगळ्यांना माहिती झाल्यामुळे तिच्यापासून सारेच दुरावले आहेत. दरम्यान, ती अनुसूचित जमातीची असल्यामुळे या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हासुद्धा दाखल होणार असल्याचे प्रतापनगर पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार