शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

धक्कादायक ! जावई आणि मेव्हण्याने रचला होता अपहरणाचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:18 IST

चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देहल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न : निर्जन ठिकाणी नेऊन वसूलणार होते खंडणी : आरोपींनी दिली पोलिसांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. धंतोली पोलिसांनी बुधवारी रात्री आतिश सिंगला अटक केली. त्यामुळे आता या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली आहे.मध्य भारतातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करून धंतोली पोलिसांनी २ जुलैच्या रात्री या अपहरणकांडाचा सूत्रधार पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर), सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) यांना अटक केली. न्यायालयातून त्यांची ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मारुती व्हॅनही जप्त केली आहे. बुधवारी पुन्हा आतिश सिंगला अटक करण्यात आली. २८ एप्रिलला ज्यावेळी आरोपींनी अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपी आतिश सिंग तेथे हजर होता. त्यानेच सर्व गुन्हेगारांची त्याचा जावई श्यामबहादूरला भेट घालून दिली. या सर्वांसोबत गुन्ह्यात सहभागी असलेला बाळू ऊर्फ नीलेश अंबाडरे (वय २७, रा. इमामवाडा) नामक आरोपी फरार आहे.२८ एप्रिल २०१८ ला राजेंद्र अग्रवाल त्यांचा वाहनचालक कपिलराज चव्हाणसोबत शनी मंदिरात दर्शनाला आले होते. दर्शन आटोपल्यानंतर तेथील भाविकांना ते प्रसाद वाटत होते. त्यावेळी झालेल्या गर्दीचा गैरफयदा घेत आरोपींनी अग्रवाल यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्रवाल यांना आरोपी ओळखत नसल्यामुळे त्यांनी अग्रवाल समजून त्यांचा वाहनचालक चव्हाण यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. चव्हाण यांनी आरोपींचा जोरदार प्रतिकार केल्याने त्यावेळी हा गुन्हा टळला. त्यानंतर आरोपींनी अग्रवाल यांच्या मोबाईलवर २८ जूनला वारंवार फोन आणि मेसेज करून ५० लाखांची खंडणी दिली नाही तर अपहरण करून जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. हा प्रकार पोलिसांना कळताच धंतोली पोलिसांनी धावपळ करून या अपहरणकांडाचा उलगडा करून उपरोक्त आरोपींना अटक केली.मार्गही ठरवून ठेवला होतादरम्यान, आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी अग्रवाल यांचे अपहरण केल्यानंतर ते काय करणार होते, याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, अग्रवाल यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना पागलखाना चौकातून कळमेश्वरकडे न्यायचे. एका निर्जन ठिकाणी नेल्यानंतर अग्रवाल यांच्या नातेवाईकांना फोन करून खंडणीची रक्कम मागायची. नंतर काय करायचे, हे त्यांनी सांगितले नाही. मात्र, अग्रवाल यांना कोणत्या मार्गाने नागपूरच्या बाहेर न्यायचे, हे आरोपींनी आधीच ठरवून ठेवले होते. पोलिसांना त्यांनी तशी माहिती दिल्याचे समजते.आरोपींमध्ये तीन खतरनाक गुन्हेगारया गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींमध्ये गौरव चव्हाण, अतुल पाटील तसेच फरार असलेला नीलेश अंबाडरे हे तिघे खतरनाक गुन्हेगार आहेत. गौरव चव्हाणविरुद्ध हत्या, लुटमार, पाटीलविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लुटमार आणि हत्यार कायदा तसेच अंबाडरेविरुद्धही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी काही खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांनी वर्तविली आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण