शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, नागपुरातील मेयो इस्पितळात इंटर्न विद्यार्थिनीसमोर सफाई कर्मचाऱ्याचे अश्लील कृत्य

By योगेश पांडे | Updated: May 6, 2025 23:45 IST

Nagpur Crime News: मेयो इस्पितळात एका इंटर्न तरुणीसमोर लिफ्टमध्ये सफाई कर्मचाऱ्याने स्वत:चे कपडे काढून अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे मेयोत खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे इंटर्न्समध्ये संतापाचे वातावरण असून मेयो प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर आहे.

- योगेश पांडे  नागपूर  - मेयो इस्पितळात एका इंटर्न तरुणीसमोर लिफ्टमध्ये सफाई कर्मचाऱ्याने स्वत:चे कपडे काढून अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे मेयोत खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे इंटर्न्समध्ये संतापाचे वातावरण असून मेयो प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर आहे. मनोहर नत्थुलाल समुद्रे (वय ५२, आदर्शनगर, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे.

संबंधित तरुणीचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून तिची मेयोत इंटर्नशिप सुरू आहे. सोमवारी साडेदहा वाजताच्या सुमारास ती मेयोत होती. तिला वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये जायचे होते. त्यासाठी ती सर्जिकल कॉम्प्लेक्समधील ऑपरेशन थिएटरसमोरील लिफ्टने दुसऱ्या माळ्यावर जायला निघाली. लिफ्टमध्ये मनोहरदेखील होता व त्याला चौथ्या मजल्यावर जायचे होते. त्याच्याजवळ काही सामान होते. तरुणीने दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी बटन दाबले. लिफ्ट वर जाऊ लागताच त्याने घाणेरडे चाळे सुरू केले. त्याने पॅन्ट व अंतर्वस्त्र काढले आणि अश्लील चाळे सुरू केले. यामुळे इंटर्न हादरली. तिने हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली व तेवढ्यात दुसरा माळ्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला. ती धावतच बाहेर पडली. ती हादरली असल्याने वॉर्डमध्ये न जाता पायऱ्यांनी खाली गेली व तिने इतर इंटर्न्सला आपबीती सांगितली. सर्वांनी आरोपीचा शोध सुरू केला. मात्र, तो दिसला नाही. काही वेळाने तो बाहेरच्या बाजूला दिसला. त्याला इंटर्न्सनी पकडले. तरुणीच्या तक्रारीवरून तहसील पोलिस ठाण्यात आरोपी मनोहरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला सक्तीच्या रजेवर पाठविलेमेयो प्रशासनाने ही घटना गंभीरतेने घेतली आहे. ही घटना दुर्दैवी आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित कर्मचाऱ्याला बिनपगारी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. विशाखा समितीकडेही तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर