शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Income Tax: हातावर पोट भरणाऱ्या मजुराला आयकर विभागाकडून तब्बल ३१४ कोटींची नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:25 IST

भाड्याच्या घरात राहणारा आणि मुजरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मजुराला आयकर विभागाकडून तब्बल ३१४ कोटी ७९ लाख ८७ हजार ८३ रुपयांची नोटीस मिळाली.

हातावर पोट भरणाऱ्या एका मजुराला आयकर विभागाकडून ३१४ कोटी रुपयांची नोटीस मिळाली. आर्थिक परिस्थिती बिकट असताना आयकर विभागाने कोट्यावधी रुपयांची नोटीस पाठवल्याने मजूर आजारी पडला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी विनंती मजुराने केली आहे.

चंद्रशेखर पंडित राव कोहाड असे मजुराचे नाव आहे. चंद्रशेखर हा मूळचा मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील रहिवाशी आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून नागपूर येथे मजुरी करत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्रशेखरला आयकर विभागाकडून तब्बल ३१४ कोटी ७९ लाख ८७ हजार ८३ रुपयांची नोटीस मिळाली. भाड्याच्या घरात राहणारा आणि मुजरी करणाऱ्या चंद्रशेखरला हे नोटीस पाहिल्यानंतर मोठा धक्का बसला. 

नेमक प्रकरण काय?महाराष्ट्रातील आयकर विभागाने बैतुल मुलताई नगरपालिकेकडून चंद्रशेखर याच्या मालमत्तेबाबत माहिती मागितली, तेव्हा हा मुद्दा उघडकीस आला. ही चौकशी त्याच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या जमिनीवर आधारित होती. चौकशीदरम्यान, असे समजले की, ही जमीन चंद्रशेखर याच्या मालकीची नाही. तर, आमलाच्या देवठाण येथील रहिवाशी राधेलाल किराड याचा मुलगा मनोहर हरकचंद याच्या नावावर नोंदणीकृत आहे. चंद्रशेखर याच्या नावावर कोणत्याही जमिनीची नोंद नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबत आयकर विभागाला कळवण्यात आले आहे.

नोटीस मिळाल्यापासून संपूर्ण कुटूंब तणावातचंद्रशेखरने सांगितले की त्याची पत्नी आजारी आहे आणि नोटीस मिळाल्यापासून संपूर्ण कुटुंबावर मानसिक ताणावात आहे. चंद्रशेखर स्वतः हृदयरोगी आहेत. आयकर विभागाच्या अनपेक्षित नोटीसमुळे तो आजारी पडला आहे. सध्या त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

सखोल चौकशीची मागणीचंद्रशेखरने सांगितले की, त्याने चार वर्षांपूर्वी नागपुरात एक बँक खाते उघडले होते, तिथे तो रोजच्या कमाईतून काही बचत जमा करत होता. बँकेतील एजंटने त्याच्याकडून मोबाईल नंबर घेतला होता. परंतु, तो नंबर कधीही त्यांच्या खात्याशी जोडला गेला नाही, असेही तो म्हणाला. या व्यवहारांशी कोणताही संबंध नसताना इतका मोठा कर कसा लादला गेला, याबाबत जाणून घेण्यासाठी चंद्रशेखरने संबंधित अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची विनंती केली आहे. नकळत त्याच्या नावाने गैरवापर केल्याचा त्यांना संशय आहे.

टॅग्स :nagpurनागपूरIncome Taxइन्कम टॅक्सSocial Viralसोशल व्हायरलMadhya Pradeshमध्य प्रदेश