शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कुरिअरने मागवलं सामान, बॉक्स उघडताच निघाला कोब्रा साप; पाहणाऱ्याचा उडाला थरकाप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 21:36 IST

बॉक्समधून बाहेर येऊन साप पळून गेला, सर्पमित्रालाही तो सापडला नाही.

नागपूर: तुम्ही अनेकदा टीव्हीवर किंवा प्रत्यक्षात विषारी साप पाहिले असतील. पण, मानवी वस्तीत क्वचितच साप दिसून येतो. सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यात एका कुरिअरच्या बॉक्समधून कोब्रा साप निघाल्याची घटना घडलीय. नागपूरच्या ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या सुनील लखेटे यांच्यासोबत ही घटना घडली. त्यांनी बंगळुरुवरुन काही सामान मागवलं होतं, सामानाचे बॉक्स घरी आले. त्यांनी बॉक्स उघडताच त्यातून एक विषारी कोब्रा साप बाहेर पडला. 

बंगळुरुवरुन मुलीचे सामान मागवलेसुनील यांची मुलगी बंगळुरुमध्ये नोकरी करायची, पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ती मागील अनेक दिवसांपासून घरुन काम करू लागली. त्यामुळे त्यांनी बंगळुरुमधील मुलीचे सर्व सामान परत मागवले. एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीने त्यांना बॉक्समध्ये भरुन हे सामान नागपूरला पाठवले. कंपनीच्या कुरिअर बॉयने सर्व बॉक्स लखेटे यांच्या घरी पोहोचवले. त्यांनी हे बॉक्स उघडताच त्यात त्यांना एक विषारी कोब्रा साप दिसला. 

बॉक्समधून साप नाल्यात पळालायादरम्यान साप त्या बॉक्समधून बाहेर आला आणि नाल्यात पळाला. यानंतर लखेटे कुटुंबियांनी सापाला शोधण्यासाठी सर्पमित्राला फोन केला, पण सर्पमित्रालाही तो साप काही सापडला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बॉक्समध्ये साप निघाला, त्या बॉक्सला छिद्र पडलेलं होतं. त्यामुळे याच छिद्रातून साप आत शिरल्याचा अंदाज लावला जातोय. हा साप पळून गेला असला तरी, सध्या लखेटे कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरsnakeसाप